समर्पण – एक प्रेमकथा

समर्पण – एक प्रेमकथा

प्रकरण एक

सायंकाळचे सहा वाजत होते. विनयने दारावरची बेल वाजविली. दार उघडून आईने विचारले “अरे तू आहेस तर..”. आई उत्साहात दिसत होती.

“आता अजून कोण असणार आहे आई ? बाबांना यायला अजून दोन दिवस आहेत आणि तू आतापासूनच नटून तयार”

“ए गप रे..आईची थट्टा करतोस होय..अरे माझी एक मैत्रिण, रत्ना येणार आहे.”

“तरीच इतकी खूष दिसत आहेस…चला मग मी जातो खाली मित्रांसोबत खेळायला”

“विनय हे तुझं नेहमीचंच..अरे घरी पाहुणे येत असले की पळ काढायचा. चांगली सवय नाही ही…थोडं मिसळावं लोकांमध्ये ना”

“अगं आई, पण तुझी मैत्रीण खूप दिवसाने भेटत आहेस ना. मग तुम्ही बोला की निवांत, मी काय बोलणार त्यांच्याशी.”

“अरे तिची मुलं पण येणार आहेत तिच्यासोबत. तु त्यांच्याशी ओळख करुन घे.”

“बर” विनयनं काहीशा अनिच्छेनेच म्हंटलं.

“मग नाही जात ना खाली ?”

“आई, मी काय पुर्ण सायंकाळ जात नाहीये खेळायला…येतो ७-७:३० पर्यंत”

विनय निघाला. लिफ्टने खाली आला तसा त्याला एक चाळिशीतल्या बाई , एक तरुण मुलगी आणि एक  आठ-नऊ वर्षांचा मुलगा असे तिघेजण बिल्डिंगकडे येताना दिसले. ती मुलगी सुंदर आणि स्मार्ट वाटत होती. विनयला आठवले की चार-पाच दिवसापूर्वी त्याने या सगळ्यांना समोरच्या बिल्डिंगजवळ पाहिले होते. बहुधा त्याच दिवशी ते सगळे तिथे रहायला आले असावेत. आपल्याकडे येणार असलेले पाहूणे कदाचित हेच असतील असा विचार त्याच्या डोक्यात आला. तो मित्रांकडे गेला. पण फार वेळ त्यांच्यासोबत थांबला नाही. घरी आलेल्या पाहुण्यांबद्दल त्याला आता उत्सुकता निर्माण झाली होती त्यामुळे तो लवकरच घरी आला.

विनयचा तर्क बरोबरच होता. ते तिघे विनयच्या घरीच आले होते.

आईने ओळख करुन दिली “रत्ना हा विनय. नववीत आहे.. आणि विनय ही माझी जुनी मैत्रीण आहे बर का.. आता आपल्या सोसायटी मध्ये रहायला आली आहे . म्हणजे तुझी रत्ना मावशी..”

रत्ना ने पण आपल्या मुलांची ओळख करुन दिली “विनय, ही माझी मोठी मुलगी सविता. इंजिनियरींग च्या पहिल्या वर्षाला आहे. आणि हा “

“मी अमेय. मी चौथीत आहे” आईचे वाक्य तोडत अमेय ने स्वत:ची ओळख करुन दिली.

विनयने सविता कडे नीट पाहिले. जांभळ्या रंगाचा चुडीदार घातलेली, सुंदर लांब केस असलेली सविता सुंदर दिसत होती. चेह-यावर खूप आत्मविश्वास दिसत होता.

“हॅलो सविता, हाय अमेय” विनय ने औपचारिक अभिवादन केले.

“अरे विनय, सविता काय म्हणतोस ? मोठी आहे ती तुझ्यापेक्षा. ताई म्हण” विनयच्या आईने विनयला टोकले.

“माधवी अगं ही नवी पिढी, आपल्या वेळची ’ताई-दादा’ वाली पध्दत आता जुनी झाली. त्यांना त्यांच्या पद्धतीने वागू द्यावं” रत्नाने माधवी ला समजावले. विनयला दिलासा मिळाला. “अशा सुंदर आणि स्मार्ट मुलीला ताई बनवायचे म्हणजे…छे..” विनय स्वत:शी विचार करत होता.

“हाय विनय..” सविता ने विनयच्या हॅलो चे उत्तर दिले.

“तू व्हॉलीबॉल खेळतोस ना ? परवा मी तुला पाहिलं सोसायटीत खेळताना” सविताने संवाद वाढवला.

“हो. मी खेळत असतो संध्याकाळी. आमचा ग्रुप आहे”

असाच काही वेळ संवाद चालत राहिला.

अमेय कंटाळला व आईला म्हणू लागला “चल आई घरी”

रत्नाने त्याला समजविण्याचा प्रयत्न केला.

माधवीने पण समजाविले “अरे आता मावशीकडे जेवून च जाशील ना”

पण अमेयचा हट्ट चालूच होता.

मग सविताने त्याला समजावले “अमेय, असं काय करतोस बरं.. आपलं काय ठरलं होतं आपण मावशीकडे जेवून मग घरी जाणार ना. तु कंटाळलास का ?”

“हो…मला कंटाळा आला. तुम्ही सगळे गप्पा मारत बसले. मी बोअर झालो”

तसं विनयनं सुचवलं “चल तुला कॉम्प्युटर चालू करुन देतो. तु गेम्स खेळ”

“अरे नको रे बाबा..एकदा गेम्स खेळायला लागला की मग जेवायला पण उठायचा नाही. हट्टी झाला आहे आता तो..” रत्नानं त्रागा केला.

ते ऐकून अमेय खट्टू झाला. सविताने मग त्याला जवळ घेत म्हंटलं “नाही हं आई माझा अमेय काही हट्टी नाही. माझं सगळं ऐकतो तो. हो ना रे अमू? बरं गेम्स खेळ पण मावशीने जेवायला हाक मारली की लगेच उठायचं. प्रॉमिस ?”

“प्रॉमिस ताई” अमेय खुष झाला.

रत्ना बोलू लागली “अगं हे पण घरी खूप कमी असतात, माझा जॉब मग अमेयकडे सविताच बघते जास्त.  कधी गोड बोलून तर कधी थोडा धाक देवून सांभाळते ती त्याला”

“मला वाटतं, वडील घरी कमी राहत असलेत की मुलं लवकर समंजस होतात आणि जबाबदारीने वागतात. विनयच्या बाबांचा पण मार्केटिंग चा जॉब ना. महिन्यातून पंधरा-वीस दिवस तरी बाहेर असतात. पण ते नसताना मला विनयचा आधार असतो.” माधवी म्हणाली.

“हे मात्र खरं ह. आमची पण तीच कथा आहे. स्वत:चा व्यवसाय असल्याने ह्यांचे सतत दौरे चालू असतात. त्यामुळे सविता लवकर समंजस झाली. गेले ४-५ वर्षांपासून तरी ती अमेयकडे आणि घराकडेपण लक्ष देते. आणि अमेयच फक्त नाही तर , माझे दीर जवळच रहायचे तर त्याची दोन्ही मुलं पण खूपदा आमच्याकडेच असायची. सविता कॉलेज आणि अभ्यास सांभाळून तिघा मुलांना पण सांभाळायची. कधी प्रेमाने तर कधी थोडफार रागवून सगळ्यांना छान शिस्त लावते बरं ती..” रत्नाच्या बोलण्यातून मुलीबद्दल कौतूक जाणवत होते.

“हो.. पण खूप मस्ती केली की मग मात्र धपाटे हं.. काय अमू ?” सविताने हसून विचारले

“नाही गं ताई..मी नाही मस्ती करत…प्रिया करायची खूप मस्ती आणि धपाटे पण खायची.. ही हि..”

विनय विचार करु लागला, समोर बसलेली ही सुंदर, स्मार्ट मुलगी आपल्या तीन भावंडाना शिस्त लावते, कधी धपाटे पण घालते. त्याच्या मनात सविताबद्दल काहीशी उत्सुकता निर्माण झाली.

सविता आणि अमेय विनयबरोबर त्याच्या खोलीत गेले.

विनयने कॉम्पुटर चालू करुन अमेयला गेम्स खेळायला दिले.

त्याच्या खोलीकडे बघत सविता म्हणाली “छान ठेवली आहेस रे बेडरुम, म्हणजे पसारा नाही फारसा, सगळं नीटनेटकं”

“थॅंक्स..”

दोघांचा संवाद होत राहिला. खेळ, अभ्यास, करिअर मधल्या संधी अशा वेगवेगळ्या विषयावर बोलताना वेळ कसा गेला तए त्यांना समजले नाही. सविताशी बोलताना विनयला एक आगळाच आनंद, अनामिक हुरहुर यांचा अनुभव येत होता.

माधवीने सगळ्यांना जेवायला बोलावले. अमेय आधी कबूल केल्याप्रमाणे दोनच मिनटात जेवायला गेला. पण विनय आणि सविताने “येत्तोच हं दोन मिनटात” म्हणत १०-१५ मिनिटे काढलीत तशी रत्ना विनयच्या खोलीत येत सविताला म्हणाली “बघा आता. अमू शहाण्यासारखा येवून बसला जेवायला, आणि इथे तुमच्या गप्पा काही अजून संपत नाहीत, आता तुला धपाटे हवेत का गं”

“हो… दे ना.. मग त्यातले निम्मे मी विनयला देईन..इस अपराध मे वो भी बर्राबर का हिस्सेदार है”

“चल गधडे लवकर..आणि विनय तु पण चल बरं सगळे वाट पाहतायत. ह्या पोरीला गप्पा मारायला खूप आवडतं..तिच्या गप्पा काही संपणार नाहीत”

तिघांचा मोर्चा डायनिंग रुमकडे वळाला. पण विनयचे चित्त वेगळ्या विश्वात होते. सविता ने गमतीनेच म्हटले होते की “निम्मे धपाटे विनयला देईन” पण त्या वाक्याने त्याच्या अंगावर रोमांच एभे राहिले होते.

हसत खेळत सगळ्यांनी जेवण संपविले.

रत्ना जायला निघाली. जाताना तिने  माधविला घरी यायचे निमंत्रण दिले “आता तू ये गं घरी. आणि विनयच्या बाबांना पण घेवून ये.”

“अगं नक्की येवू, तुझे यजमान आलेत की सांग मग सगळ्यांचीच ओळख होईल” माधवी म्हणाली

“विनय तू पण येशील रे” सविता म्हणाली,

“हो, येईन ना”

“ सध्या माझी सेम्सिस्टर संपली आहे आणि सुट्या चालू आहे तर तू येत जा. मग कॉलेज चालू झालं कि बिझी राहते रे”

“हो.. नक्कीच, भेटूयात”

निरोप घेवून रत्ना, सविता आणि अमेय निघून गेले. विनय आपल्या रुममध्ये गेला तो एक अनामिक हुरहुर सोबत घेवून. झोपण्याची वेळ झाली होती. पण त्याला लवकर झोप येईना. सविताचा विचार पुन्हा पुन्हा मनात डोकावत होता. लवकरच पुन्हा भेट होईल असा विचार करत तो झोपी गेला.

इकडे रत्ना माधवीच्या घराचं तिच्या नेटकेपणाचं सविताकडे कौतुक करत घराकडे चालू लागली.

“हो आई, तो विनय पण एकदम मल्टीटॅलेंटेड आहे हं. अभ्यासात पण चांगला आहे, व्हॉलीबॉल आणि टेबलटेनिस खेळतो, गिटार पण शिकत आहे”

“अरे वा”

“आई मी त्याच्याकडून टेबल-टेनिस शिकेन”

“बरं..चल आता खूप उशीर झाला. झोप लवकर. बाकी गप्पा नंतर”

“जो हुकुम मासाहेब..” म्हणत सविता हसत तिच्या रुमकडे गेली. दिवसाचा शेवट हसत-खेळत केला पाहिजे असं तिला नेहमीचं वाटायचं. आणि आईची थट्टा किंवा अमेयशी मस्ती हे त्याकरिता तिचे दोन आवडते मार्ग होते.

(प्रकरण समाप्त)

प्रकरण दोन

विनय आणि सविता चांगले मित्र बनले. अनेकदा सुटीच्या दिवशी सविता आणि अमेय माधवी कडे यायचे. माधवी मावशी च्या हाताला अप्रतिम चव आहे असे सविताला नेहमी वाटायचे आणि ती मावशीकडून एखादी पाककृती शिकून घ्यायची. कधी माधवी ला काही कामाने बाहेर जावे लागले तर सविता माधवीच्या घरी स्वयंपाक करायची. अमेय, विनय आणि सविता खेळत, मस्ती करत दुपार घालवायचे.

सविता विनयपेक्षा जवळपास पाच वर्षांनी मोठी होती. पण वयाच्या फरकामुळे त्यांच्या मैत्रीत त्यांना अंतर जाणवले नाही. या उलट ते अधिक मोकळेपणाने बोलायचे. सविता त्याला हक्काने लहान-मोठी कामं सांगायची आणि तो ही आनंदाने करायचा. ती त्याच्याकडून कधी कधी टेबल टेनिस शिकत असे.

थोड्या दिवसांनी विनयचं नववीचं वर्ष संपलं. नववीचा निकाल लागला त्या दिवशी सविता विनयच्या घरी आली होती.

“काय रे ? काय लागला निकाल ? दाखव तरी मला”

विनयने निकालपत्रक तिला दाखवले.

ते नीट पाहत ती म्हणाली “अरे, छान आहेत की सगळे मार्क्स. फक्त गणितात जरा कमी आहे. आता दहावीचं वर्ष आहे तर थोडी जास्त मेहनत घ्यावी लागेल”

माधवी पण तिथेच होती, ती सविताला म्हणाली “अगं तसा तो अभ्यास मन लावून करतो. पण गणिताचा जास्त सराव करायचा कंटाळा करतो. दहावीचं वर्ष आहे. थोडा अधिक सराव हवा ना. एखादा कोचिंग क्लास लाव म्हणते तर ऐकत नाही”

“आई, मला रोज सहा तास शाळेत बसून, पुन्हा दोन तास क्लासला नाही बसायचं. आणि तशी गरज पण नाही. मी करेन जास्त मेहनत. तु नको काळजी करुस.”

“हं..असं म्हणतोस पण नंतर कंटाळा करतोस तू सरावाचा”

मध्येच सविता म्हणाली “मावशी मी करुन घेईन त्याच्याकडून गणिताचा अभ्यास आणि सराव”

“अगं पण तुझं कॉलेज, इंजिनियरिंगचा अभ्यास. तुला कुठे वेळ मिळणार” माधवी म्ह्णाली.

“काही हरकत नाही मावशी. मी काही रोज त्याची शिकवणी घेणार नाही. तसंही तो म्हणतो ते पण बरोबर आहे. रोज इतका वेळ शाळा, पुन्हा क्लास हे थोडं जास्त होतं. मी फक्त रविवारी त्याची शिकवणी घेईन. विनय येत्या रविवार पासूनच येत जा दुपारी तीन वाजता”

“सविता, पण अजून शाळा चालूही झाली नाही. शाळा चालू झाल्यावर चालू करुयात ना.” विनय म्हणाला.

“ते काही नाही. या आठवड्यापासूनच सुरवात करायची. दर रविवारी दुपारी.”

“बरं चालेल”

“आणि भरपूर होमवर्क पण देणार मी तुला सरावाला तो तुला पूर्ण करावा लागेल.”

“आता होमवर्क आणि कशाला” विनयनं त्रागा केला.

“वा..आतापासूनच कंटाळा का रे..असं कसं चालेल बरं”

“सविता तू त्याचं काही ऐकू नकोस. मुल कंटाळा करतातच. पण तू त्याला थोडा धाक लावून मेहनत करायला लाव” माधवी च्या या वाक्याने सविताला हसू फुटले.

“हो तर.. मी छडीच घेवून बसणार आहे”

सविताच्या आणि आईच्या युतीपुढे विनय गप्प बसला. पण सविताने गमतीने म्हंटलेली छडीच्या गोष्टीने त्याच्या मनात एक कुतुहल निर्माण झाले.

०—–०

रविवारी विनय सविताच्या घरी गेला. दोन वाजून दहा मिनटे झाली होती. सविताने घड्याळाकडे नजर टाकत म्हंटले “पहिल्याच दिवशी उशीर !! पहिला दिवस आहे म्हणून जास्त काही बोलत नाही पण पुढच्या वेळेपासून तु ठीक एक पच्चावन ला इथे हवास. दोन वाजता बरोबर आपण क्लास सुरु करु”

“हो. ..” विनयने मान डोलावली.

सविता ने शिकविण्यास सुरुवात केली. ती संथपणे पण अतिशय नीट शिकवत होती. विनय अधून-मधून शंका विचारायचा आणि ती अगदी मुळातून त्या शंकांचं निरसन करायची. क्लास संपविताना तिने त्याल सगळा भाग नीट समजला असल्याची खात्री करुन घेतली आणि मग घरी सराव करण्यासाठी थोडी उदाहरण करायला सांगितली.

“पुढच्या रविवारी येतान हा सगळा होमवर्क करुन ये. काही अडलं तर मध्ये सायंकाळी सात नंतर येवू शकतोस”

“इतका सारा होमवर्क एकदम ?”

“विनय. हा एका आठवड्यात करायचा आहे तुला, एका दिवसात करायला नाही सांगत. आणि अजून शाळा सुरु व्हायची आहे तर वेळ पण खूप आहे तुझ्याकडे”

“हं..म्हणजे सुटीत पण अभ्यास, आणि शाळा सुरु झाल्यावर पण अभ्यास. काय ही दहावी ?..”

“हो. करावाच लागेल अभ्यास. आणि आता वर्ष सुरु होत आहे तरच कंटाळा ? काही असो. तुला होमवर्क करावाच लागेल” सविताच्या आवाजात काहीशी जरब होती.

“हं.. जशी आपली आज्ञा. येवू मी आता”

“का रे ? बस ना. मी नाश्त्याला बनवते काहीतरी, तोवर तू अमेय सोबत मस्ती कर” शिकवणी ची वेळ संपताच सविता पुन्हा विनयची मैत्रिण झाली.

०—–०

पुढच्या रविवारी विनय वेळेवर सविताच्या घरी गेला. सविता त्याने केलेला होमवर्क तपासू लागली.

“होमवर्क अपूर्ण दिसतोय”

“नाही तर.. मी सगळा केला” म्हणत विनय पुन्हा वहीत पाहू लागला.

“हं.. थोडा राहून गेला वाटतं. सॉरी. आता घरी गेलो की लगेच करेन”

“बरं..” सविताने शिकवायला सुरवात केली.

चार वाजता शिकवणीची वेळ संपल्यावर तिने त्याला विचारले “विनय, तुला टी.व्ही वरचा कोणता कार्यक्रम सर्वात जास्त आवडतो”

त्याने एका विनोदी मालिकेचे नाव सांगितले.

“रोज असते का रे ही मालिका ?”

“नाही. गुरुवारी असते. रात्री नऊ ते दहा”

“तू पाहतच असशील ना दर गुरुवारी”

“हो पाहतो ना”

“बरं. मग या आठवडयात नाही पहायचीस”

“का ?” विनयने गोंधळून विचारले

“होमवर्क पूर्ण नाही केलास ना त्याची शिक्षा.”

“अगं पण मी आता लगेच होमवर्क पूर्ण करेन ना. आजच करेन.”

“एका क्लास मध्ये दिलेला होमवर्क पूर्ण करायला पुढच्या रविवारी दोन वाजण्यापर्यंतच वेळ आहे. तोपर्यंत तू होमवर्क एकदम पूर्ण केला नाहीस तर तुला शिक्षा मिळणारच”

“हं..पण तुला कसं कळणार मी मालिका पाहतो की नाही ? तु आमच्या घरी येणार का त्या वेळी की आईला विचारणार?”

“नाही. आणि त्याची गरज पण नाही. मी तुलाच विचारणार पाहिलीस का म्हणून. आणि तु माझ्याशी खोटं बोलणार नाहीस. बरोबर ना ?”

“हो.”

०—–०

पुढील रविवारी विनयने सगळा होमवर्क नीट केला होता. सविताने त्याबद्दल समाधान व्यक्त केले. शिकवणी संपत असताना सविताने आपला मोबाईल काढला

“विनय तुला एक जोक ऐकवते”  असं म्हणत एक विनोद वाचून दाखवला

“अगं किती जुनाट जोक आहे. मी तुला एकदम नवीन जोक ऐकवतो” म्हणत विनयने एक विनोद ऐकवला.

“हा मस्त होता रे…थांब माझ्याकडे अजून एक नवीन आणि मस्त जोक आहे” तिनं अजून एक विनोद ऐकवला.

“अगं हा तर नुकताच ऐकला आहे… हो गुरुवारी, कॉमेडी शो च्या एपिसोडमध्ये”

“हो ? तु बघितला तो भाग ?”

“हो..पण पुर्ण नाही. पंधरा-वीस मिनीट बघितला. मग मला आठवलं की मला बघायचा नाहीये”

सविता काहीच न बोलता त्याच्याकडे बघत होती.

“सॉरी. ..” तो मान खाली घालून म्हणाला.

“फक्त वीस मिनीटं पाहिलास ?”

“हो, खरंच फक्त वीस मिनीट”

“ठीक आहे मग. कान पकडून वीस उठाबशा काढ”

“हा हा हा.. काहीपण..” विनय हसत म्हणाला.

“विनय हसायला काय झालं. मी मस्करी करत नाहीये. ही शिक्षा आहे तुला. आणि आता लगेच कान पकडून उठाबाशा काढ. मला पुन्हा सांगायला लावू नकोस नाहीतर मी शिक्षा वाढवेन”

“अगं प्लीज. असं काय करतेस. बरं मी या आठवड्यात पण ती मालिका नाही बघणार, मग तर झालं”

“तुला कधी आणि काय शिक्षा द्यायची ते मी ठरवणार तु नाही. आणि हो आपली शिकवणी चालू असू पर्यंत तू मला मॅडम किंवा मॅम म्हणशील.”

“ओके मॅड  ….म” म्हणत विनय स्वत:च्याच विनोदावर हसू लागला.

सविताचा पारा चढला होता. तिने विनयला सणकन  एक थप्पड लगावली.

“सॉरी. सॉरी मॅम” तो मान खाली घालून माफी मागू लागला.

“उठाबशा..” तिने फर्मावले.

“हो. काढतो.”

त्याने लगेच कान पकडून उठाबशा काढायला सुरवात केली. ती मोजू लागली “एक, दोन…वीस”

उठाबशा काढून झाल्यावर तो मान खाली घालून उभा होता.

तिचा राग अजून कमी झाला नव्हता. तिने टेबलच्या ड्रॉवर मधून एक स्टील ची फुटपट्टी घेतली. ती इंजिनियरिंग ची विद्यार्थिनी असल्याने तिच्याकडे अशी पट्टी होती.

“हात पुढे कर..”

“हे पण आता ?” त्याने घाबरत विचारलं

“हो. शिक्षकाचा अपमान करायचा नसतो हे समजण्यासाठी ही शिक्षा”

त्याने अधिक काही न बोलता उजवा हात समोर केला. तिने त्याचा हात हातात घेवून थोडा अजून जवळ आणला. तिच्या हाताच्या स्पर्शाने त्याच्या अंगावर रोमांच उभे राहिले.

तिने पट्टीने त्याच्या हातावर जोरात फटका दिला. इतका आवेग त्याला अनपेक्षित होता. त्याने कळवळून हात मागे घेतला आणि हाताची मुठ केली.

“हात पुढे” ती ओरडली.

त्याने घाबरतच हात पुढे केला.

“मॅम प्लीज थोड हळू मारा ना.” तो हलक्या आवाजात म्हणाला

“विनय ही शिक्षा आहे खेळ नाही, आता एक शब्द जरी बोललास तरी खूप जास्त फटके पडतील”

तो पुढे काहीच बोलला नाही. मान खाली घालून त्याने डोळे घट्ट मिटून घेतले. तिने त्याच्या हातावर सपासप फटके मारायला चालू केलेत. आठ-दहा फटके मारल्यावर तिने फर्मावले “दुसरा हात पुढे कर”

त्याने डोळे उघडले, उजवा हात मागे घेवून डावा हात पुढे केला. सविता पुन्हा एकदा फटके देण्यास सज्ज झाली होती. पण आता विनयने डोळे मिटले नाहीत. हलकेच मान वर करुन तो तिच्याकडे पाहू लागला. तिची नजर मात्र त्याच्या हातावर खिळलेली होती. पुन्हा जोराने फटके पडू लागले. विनय वेदनेने व्याकूळ झाल होता पण सविताला त्या रुपात बघाताना हरवून गेला. आता तो फटके थांबण्याची वाट बघत नव्हता. त्याच्यासाठी ते क्षण वेदनादायी असले तरी अद्भुत होते. आठ-दहा फटके मारुन ती थांबली. तिने छडी बाजूला ठेवली. पण विनय भान हरपून तसाच उभा होता.

काही क्षण तसेच गेलेत.

तिने त्याला बसायला सांगितले. तो निमूटपणे मान खाली घालून बसला.

जे झाले ते तिलाही काहीसे अनपेक्षित होते. तिला पण वाटले नव्हते की आपण कुणाला इतक्या कठोरपणे शिक्षा करु शकतो. तिच्या लहान भावंडाना ती कधी घाक लावायची पण सहसा ओरडणे किंवा फारतर एक-दोन धपाटे घालणे या पलीकडे तिने कधी कुणाला शिक्षा केली नव्हती. तिच्या मते विनय पण एक चांगला मुलगा होता. कधी कुणाचा अपमान करणा-यांतला तो नक्कीच नव्हता. पण त्याने केलेल्या एका थट्टेमुळे रागावून तिने त्याला कठोरपणे छडीचे फटके दिले होते.  तिला काहीसे अपराधी वाटू लागले.

ती विनयच्या शेजारी बसली.

“विनय, फार लागलं का रे” तिने काळजीच्या स्वराने विचारले.

त्याने काहीच उत्तर दिले नाही.

तिने त्याचे हात हातात घेतले. त्याच्या हातांवर काहीसे वळ उमटले होते.

त्याने मान वर करुन तिच्याकडे पाहिले. त्याच्या डोळ्यात पाणी पाहून ती गलबलली.

“सॉरी रे.. माफ कर मला. मी जास्तच कठोरपणे शासन केलं तुला”

“नाही मॅम. मी तुमचं ऐकलं नाही आणि तुमचा अपमान पण केला”

“विनय, एक मित्र म्हणून तु माझी कितीपण थट्टा-मस्करी केलीस तर मला राग येणार नाही. पण शिक्षकांचा अपमान करु नये रे”

“मॅम मी नाही करत कधी शिक्षकांचा अपमान. आज चुकलो. पुन्हा नाही असं करणार”

“बरं. डोळे पुस आता. तुला भेळ आवडते ना ? मी भेळ करते. आणि चहा पण बनवते” तिने त्याच्या डोक्यावरुन हात फिरवत त्याला जवळ घेतले.

विनय घरी आला. हातंची लाही होत होती. आपल्या तळहाताकडे बघत तो पलंगावर बसून राहिला.

पुढचे दोन तीन दिवस घडलेला प्रसंग तो पुन्हा पुन्हा आठवत होता. त्यावेळची त्याची भावना त्यालाच नीट समजत नव्हती. तो स्वत:शी विचार करत होता “मला सविता मॅम चा राग नाही आल.. कठोर शिक्षा मिळाल्याने दु:ख झालंय का ? पण तसंही वाटत नाही. आईने एक-दोन वेळेस विचारलं की इतका शांत का आहेस ? काय झालंय ? पण तिला काही सांगावंसं नाही वाटलं. काल व्हॉलीबॉल खेळताना बॉल चा फटका बसला आणि दुख-या हाताची वेदना उफाळली, थोडा कळवळलो पण.. पण कुठेतरी एक अनामिक समाधान वाटले. तसं तर सविता मॅमकडे शिकायला नाही जायचे असे मी म्हटले तर आई मला नक्कीच जबरदस्ती करणार नाही. पण मला असं करावसं वाटत नाहीये. इतका मार पडल्यानंतरही मी कुठेतरी पुढच्या रविवारची आतुरतेने वाट पहातोय..नेमकं काय होतंय तेच मला कळत नाहीये.”

सविताची पण काहीशी तशीच स्थिती झाली होती. झालेला प्रसंग तिला पुन्हा पुन्हा आठवत होता. ती विचार करत होती “विनयशी मी खूप कठोर वागले. इतक्या कठोरपणे त्याला फटके द्यायला नको होते. विनय मावशी ला तर हे सांगणार नाही ना…तसं झालं तर मावशी त्याला पुन्हा शिकवणीला पाठवणार नाही. कदावित मावशीला राग येईल माझा… पण नाही. मला वाटतं विनय यातलं काही घरी सांगणार नाही. पण त्याल माझा राग आला असेल का ? मी एक चांगला मित्र तर गमावणार नाही ना ? मी का मारलं त्याला इतकं ? खरंच त्याने असा काही फार मोठा काही गुन्हा केला होता का ? त्याला छडीचे फटके देताना मला इतका त्वेष का चढला होता ? त्याला कानाखाली वाजवल्यानंतर तो गप्प बसला, निमूटपणे उठाबाशा ही काढल्या म्हणून माझ्यात आणखी जास्त त्वेष संचारला का ? तो मुकाट्याने हात पुढे करुन छडीचे वार झेलत असताना मला आनंद होत होता का ?”  स्वत:च्या या विचारांनी सविता चपापाली. “मी केवळ शिक्षा म्हणून विनयला मार दिला की माझ्या आनंदासाठी ? आणि त्याने पण का खाल्लेत इतके फटके ? विनय चांगल्या शाळेत शिकतो. आणि अशा प्रकारे तिथे शिक्षा दिल्या जात नाहीत. मावशी ने पण सहसा त्याला कधी मारलं असेल असं वाटत नाही. मावशी तर किती शांत आहेत. मग तो निघून का नाही गेला ? किंवा थोडीपण नाराजी दाखवली नाही त्याने. असं वाटत होतं की दिलेत त्याच्या चौपट फटके त्याला दिले असते तरी त्याने ने निमूटपणे खाल्ले असते.”

०—–०

गुरुवारी सकाळी सविताला आठवलं की आज विनयचा वाढदिवस आहे. तिने विचार केला “विनय कदाचित रागावला असेल. त्याच्याकरिता मिठाई आणि एखादी भेटवस्तू घेवून जाते. तरी राग नाही गेला तर मी सरळ त्याची माफी मागेन. फार चांगला मुलगा आहे, मला त्याची मैत्री गमवायची नाही”

तिने आईला सांगितले “आई मी मावशीकडे जाते, आज विनयचा वाढदिवस आहे. त्याच्याकरिता काहीतरी भेट आणि मिठाई नेते”

“अग मग लवकर समोरच्या दुकानातून आण. मी पण येते तुझ्यासोबत. मी तशीच मग ऑफिसला जाईन”

“ठीक आहे आई”.

ठरल्याप्रमाणे दोघी विनयकडे आल्यात. रत्नाने आणि सविताने विनयला शुभेच्छा दिल्यात.

“अरे विनय, बेटा मावशीला नमस्कार तरी कर” माधवी प्रेमाने म्हणाली.

“हो. विसरलोच” म्हणत विनयने रत्नाला वाकून नमस्कार केला.

तसंच त्याने सविताला पण वाकून नमस्कार केला.

“अरे.. वेड्या. मला काय ..” सविता एकदम गोंधळून म्हणाली. तिच्या डोळ्यांत पाणी तरारले.

“हो.. आता तु त्याची गुरु आहेस ना” माधवी हसून म्हणाली.

“खूप आनंदी रहा” सविताने त्याच्या डोक्यावरुन हात फिरवित आशिर्वाद दिला.

रत्नाला ऑफिसला जायचे होते. त्यामुळे ती निघाली. तिला बाहेर लिफ्टप्रर्यंत सोडत मैत्रिणींच्या गप्पा रंगू लागल्या. ते पाहून विनय आणि सविता खळाळून हसले.

“विनय.. तुला राग आला असेल ना माझा..” सविताने विचारले

“नाही मॅम. खरंच नाही आला”

“खूप लागलं का रे तुला त्या दिवशी. सॉरी रे”

“मॅम पण लागलं नसतं तर शिक्षा झालीच नसती ना”

“अरे मॅम फक्त क्लासच्या वेळेत म्हणायचंस. एरवी सविता. आणि ए वेड्या, काय आवडतो की काय मार खायला. मला थांबवलंस का नाही मारताना”

“मी थांबवलं असतं तरं तू थांबली असतीस ? आणि मला नाही वाटंलं तुला थांबवावसं ..”

“पण खूपच मारलं रे मी तुला. मलाच वाईट वाटतंय”

“तू नको वाईट वाटून घेउस. तु इतकं छान मनापासून शिकवतेस तर शिक्षा करतान पण मनापसून करणार ना”

“हं… तु मावशी ला सांगितलंस का रे ? मावशीला राग आला असेल ना माझा?”

“शिक्षेबद्दल ? अजिबात नाही. मी आईला काहीच सांगितलं नाही आणि यापुढे पण तु शिक्षा केलीस तरी आईला सांगणार नाही कधीच”.

“तु खूप छान आहेस विनय. चल भेटूयात आता रविवारी. पुन्हा एकदा ‘हॅपी बर्थ डे’”

“मॅम तुमचा बर्थ डे कधी असतो ? मला पण तुम्हाला गिफ्ट द्यायचं आहे..”

“असं ? काय गिफ्ट देणार मला ?”

“एक छडी”

“पण ती तर माझ्याकडे आहे आधीच”

“हो मॅम. पण आपला क्लास दहा महिने चालणार ना. आणि तुम्ही मला अशाच मारत राहिलात तर ती छडी तीन-चार महिन्यात तुटून जाईल नक्की”

“हो का गधड्या. मग तर बघ आता दर आठवड्यालाच एक छडी मोडते मी तुझ्या हातावर” सविताने हसत विनयच्या पाठीत धपाटा घातला.

०—–०

विनय शिकवणीसाठी सविताकडे जात राहिला. सविता छान शिकवायची. पण अधून मधून विनयला त्याच्या अनियमितपणासाठी कधी उठाबशा, कधी छडीचे फटके अशा शिक्षा मिळत होत्या. बोर्डाचि परीक्षा जशी जशी जवळ येवू लागली तसा तो अधिकाधिक गंभीर होत गेला.  हळूहळू सविताने पण त्याला शिक्षा देणे बंद केले. तो परीक्षेत चांगले यश मिळवेल याची तिला खात्री वाटत होती.

विनयची परीक्षा संपली. सुटीच्या दिवसांत तो जास्तीत जास्त वेळ टी.व्ही बघण्यात आणि व्हॉलीबॉल खेळण्यात घालवित असे. सविताचा मात्र अभ्यास वाढलेला होता. सविता सोसायटीत येत जात असताना विनयला भेटत असे. पण निवांत भेट होत नव्हती. विनय अनेकदा सविताकडच्या शिकवणीच्या आठवणीत रमून जायचा.

लवकरच बोर्डाचा निकाल लागला. अपेक्षेप्रमाणेच विनयने उत्तम यश मिळवले होते. पेढे घेवून तो सविता कडे गेला. रत्नाला पेढे देवून त्याने नमस्कार केला. सविताला पेढे देण्यासाठी तो तिच्या खोलीकडे निघाला. सविताला वाकून नमस्कार करण्यासाठी तो उत्तेजित झाला होता.

(प्रकरण समाप्त)

प्रकरण तीन

विनयने अकरावीला शास्त्र शाखेत प्रवेश घेतला. कॉलेजमधले नवीन वातावरण, नवीन अभ्यास यात तो व्यस्त झाला. सविताशी अधून मधून भेट व्हायची. क्वचित कधी टेबल-टेनिस खेळण्याचा किंवा बाहेर कुठे फिरायला जाण्याचे बेत होत असे.

सविता आता त्याच्या अभ्यासात लक्ष देत नसे. पण त्याला बजावून ठेवले होते “हे बघ विनय. अकरावीत मुलं फारसा अभ्यास करत नाहीत. मस्ती मौजमजा कराविशी वाटते. तू पण कर. कॉलेज जीवनाचा आनंद घे मनसोक्त. पण इतका अतिरेक सुद्धा करु नकोस की पुन्हा पुढच्या वर्षी अभ्यास करावासाच वाटणार नाही. शिवाय अगदीच उनाड मुलांमध्ये मिसळू नकोस.”

“हो मॅम. तुम्ही अजिबात काळजी करु नका”

“मॅम का म्हणतोस रे .. तुला कितीदा सांगितलं की ’मॅम’ फक्त क्लासपुरतं होतं”

“मग आता ही तु माझा क्लास च घेत होतीस ना?” विनयनं डोळे मिचकावत म्हंटलं

“जा गधड्या. आता बोलतच नाही मी तुझ्याशी”

विनय मोठ्याने हसू लागला.

विनयचं अकरावीच वर्ष संपून बारावीचं वर्ष सुरु झालं. तो अभ्यासात खूप व्यस्त राहू लागला. इकडे सविताचं पण इंजिनियरींग चं शेवटचं वर्ष होतं , ती देखील बरीच व्यस्त असायची. तरी दोघे कधी सोसायटीच्या आवारात भेटायचे, थोडा वेळ बोलायचे.  अनेक विषयांवर गप्पा मारायचे, विचारांची देवाण-घेवाण व्हायची. कधी त्यांचे मतभेद होत पण तेवढ्यापुरतेच.

एका रविवारी माधवीने सविताला फोन करुन घरी बोलावले. माधवीच्या बोलण्यावरुन सविताला वाटले की ती कसलीतरी काळजी करत आहे.

“काय मावशी काय म्हणतेस ? सगळं ठीक आहे ना ?”

“अगं सगळं ठीक आहे. पण विनय अलीकडे म्हणतोय की त्याला इंजीनियरींग किंवा मेडिकल असं काहीच करायचं नाही. तर सायन्सला जावून  बी. एस्सी. करायचं. आता तू सांग इतका हुशार मुलगा आणि असं काहीतरी बोलायला लागला की चिंता वाटणार ना. तुच त्याला समजव गं”

“मावशी अगं त्याचं आणि माझं याबद्दल बोलणं झालंय. त्याला रसायनशास्त्र या विषयात खूप रस आहे. त्याला बी.एस्सी आणि पुढे एम एस्सी करुन त्या विषयात संशोधन करायचं आहे. कदाचित पी.एच.डी. पण करेल तो पुढे.”

“अगं पण नोकरीतल्या संधी आणि करियर याचा विचार करायला नको का ?”

“मावशी, अगं माझ्यावर विश्वास ठेव.  विनय खूप हुशार आणि मेहनती आहेत. त्याच्या आवडीच्या विषयांत तो खूप ज्ञान मिळवेल आणि त्याला फार चांगल्या संधी उपलब्ध होतील. हे व्हायला थोडा जास्त वेळ लागेल पण आपण त्याच्या पाठीशी उभे रहायला हवं. प्लीज तु त्याला हवं ते करु दे”

माधवीचं मन अजून मानत नव्हतं पण सविताने विनयच्या निर्णयाला पाठिंबा दिला आणि माधवीने आपला हट्ट सोडला.

०———–०

एक दिवस सायंकाळी सविता विनयच्या घरी आली.

थोडा वेळ गप्प मारल्यावर सविता ने विचारले

“काय रे विनय, काही विसरला तर नाहीस ना ?”

“म्हणजे ? मला समजलं नाही. मी काय विसरलो?”

“हं.. तु आता फार बिझी. मैत्रिणी करिता वेळ कुठे बाबा तुला”

“ओह… आठवलं. मी तुझा वाढदिवस विसरलो. खरच सॉरी. विश यू मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे सविता”

“वा फक्त विश करणार. की काही गिफ्ट पण देणार मला ?” बोलता बोलाता ते दोघे त्याच्या फ्लॅट्च्या बाल्कनीत आले.

“हो. नक्की देणार ना. तु सांग काय भेट देवू तुला”

“हं ..हे बघ खाली सोसायटीच्या बगिच्यात ते गुलाबाच फुल दिसतय ना ते घेवून ये.”

“बस्स इतकंच ? आता आणतो दोन मिनटात..”

“हो पण तु जाता येताना लिफ्ट वापरायची नाहीस. जिन्याने जायचंस आणि यायचंस”

विनय आश्चर्याने तिच्याकडे बघू लागला.

“मग.. माझा वाढदिवस विसरलास, त्याची शिक्षा नको तुला ?”

“ओके मॅम. एकदम मान्य. येतोच मी”

सात मजले झरझर उतरुन विनय खाली आला, त्याने बगीच्यातील झाडावरचे लाल गुलाबाचे फुल तोडले. सविता बाल्कनीतून त्याला बघत होती. एकदम तिच्या लक्षात आले की थट्टा-मस्करी च्या नादात आपण विनयला आपल्यासाठी चक्क लाल गुलाबाचे फुल आणायला सांगितले. त्यातला अर्थ जाणवून ती काहीशी लाजली आणि खूष देखील झाली.

दहा मिनटांनी विनय धापा टाकत आला

“अरेरे दमला वाटतं बाळ, पंखा लावू ? पाणी आणू ?” सविताने त्याची खेचायला सुरवात केली.

त्याने हळूच तिच्यापुढे लाल गुलाबाचे फुल धरले.

तिच्या ओठांवर हसू ओसंडून वहात होते.

“हे काय करशील, केसांत लावशील ?” त्याने विचारले.

“अ… हो” तिने गोंधळून उत्तर दिले.

“मी लावू ?” विनयने विचारले

ती आश्चर्यचकित झाली. तिने नजरेनंच होकार दिला आणि ती वळली.

तिच्या दाट आणि लांब रेशमी केसांना केसांना शाम्पुचा मंद सुवास येत होता. त्याने तिच्या केसांत फुल माळले. काही क्षण दोघांचे भान हरपले होते.

“थॅंक्स विनय” तिने भानावर येत म्हंटले.

त्या सुंदर आणि उत्कट क्षणांना मनात साठवत ती निघून गेली.

०———–०

विनयचं बारावीचं वर्ष संपलं. त्याने आधी ठरविल्यानुसार शास्त्र शाखेच्या पदवीकरिता प्रवेश घेतला. सविताचे इंजिनियरींग संपले होते. नौकरी मिळविण्यासाठी तिची धडपड चालू होती. पण शहरात नोकरीच्या संधी फारशा नव्हत्या. त्यामुळे बाहेर नोकरी शोधण्यावाचून पर्याय नव्हता. अखेर तिच्या धडपडीला यश येवून तिला एक मुंबईत नोकरी मिळाली. नोकरी मिळाल्याचा आनंद होता पण घर सोडावे लागणार याचे वाईट ही वाटत होते.

नोकरी मिळाल्याची बातमी तिने विनयला सांगितली

“अभिनंदन. मग आता तु कधी जाणार आहेस ?”

“अजून साधारण एक-दीड महिना आहे”

“हं… म्हणजे आत तू फक्त एक दीड महिना भेटणार तर. मग नाही.”

“नाही कशी ? महिन्यातून एकदा येईन मी. आणि आल्यावर तुला भेटेनच ना नक्की”

विनय काहीच बोलल नाही. सविताला पण काय बोलावे ते सुचत नव्हते.

ते दोघे जवळ्पास रोजच भेटत होते. सविताला वाटत होते की आता या नात्यात एक वळण यावे. पण नेमके कसले वळण ते तिला समजत नव्हते. आणि ते कसे येणार ते पण कळत नव्हते. विनयच्या मनात तिच्याबद्दल असलेले आकर्षण तिला समजत होते. आता ती दूर जाणार होती आणि विनयचे शिक्षण अजून चालू होते. त्याच्या मनात नेमके काय आहे, त्याच्या भावना परिपक्व आहेत की नाही हे काहीच तिला समजत नव्हते.  त्यामुळे पुढे काय करावे याबद्दल तिच्या मनात गोंधळ होता.

तिलाही विनय आवडत होता. पण या आकर्षणात एक वेगळेपण आहे असे तिला जाणवायचे. तिच्या अनेक मैत्रिणींना प्रियकर होते. पण त्यांच्यातल्या आकर्षणापेक्षा, त्यांच्यातल्या नात्यापेक्षा किंवा अगदी चित्रपट किंवा मालिकांत रंगविलेल्या जोडप्यांपेक्षा आपल्या नात्यात काहीतरी वेगळेपण आहे हे तिला जाणवत होते. ते वेगळेपण नेमके काय हे मात्र तिला समजत नव्हते. त्यामुळे तिच्या मनातला गोंधळ अजून वाढत होता. आणि सध्या तरी कोणतेही पाउल उचलायचे नाही असे तिने ठरवले होते. तरीपण जाण्यापुर्वी या नात्यात काहीतरी विशेष असे घडेल ज्याच्या आठवणी आपल्याला सोबत करतील असे तिला वाटायचे. जाण्याचा दिवस जसजसा जवळ येत होता तशी तिची अस्वस्थता वाढत होती.

०———–०

एक दिवस सायंकाळी सविता बाल्कनीत आली. तिचे लक्ष समोरच्या इमारतीत असलेल्या विनयच्या फ्लॅटकडे गेले. आणि तिला मोठा धक्का बसला. विनय बाल्कनीत उभा राहून सिगारेटचे झुरके घेत होता. एक मिनीटभर ती अवाक होवून पाहत होती. मग लगबगीने ती विनयच्या फ्लॅटकडे गेली.

दारावरची बेल वाजली. विनयने दार उघडले.

“हाय सविता, ये ना”

“घरी एकटाच आहेस वाटतं”

“हो. आई गावी गेलीय आज मामा कडे.”

“हं… काय करत होतास ?”

“काही खास नाही..”

“अच्छा” बोलत बोलत ती बाल्कनीत आली

“विनय वास कसला येतोय इथे”

“वास ? माहीत नाही गं” विनय थोडा गडबडला. त्याने बाल्कनीत यायचे टाळले.

“सिगारेट चा वास वाटतो हा” सविता म्हणाली तसा विनय घाबरला.

“नाही. नाही तर” विनय आता घाबरला होता.

“तु तर सिगारेट ओढली नाहीस ना ?” सविताने खोलीत येत विचारले

“नाही. काहीतरीच काय” विनयच्या हातांना घाम फुटू लागला होता

विनयच्या जवळ येवून सविताने जोरात त्याच्या कानाखाली वाजवली.

विनय पुर्णपणे घाबरुन गेला. काही न बोलता त्याने मान खाली घातली.

“लाज नाही वाटत. तु सिगारेट ओढत होतास आणि आत खोटंपण बोलतोस” असं म्हणत तिने पुन्हा एक कानाखाली वाजवली.

विनयच्या लक्षात आले की आता काही आपली सुटका नाही. तो काहीच बोलला नाही.

तिसरी, चौथी , पाचवी अशा थप्पड एक एक करत त्याच्या गालावर पडत होत्या. त्याची कानशिले तापली होती. घशाला कोरड पडली होती. पण सविताचा आवेष खूप जास्त होता जणू आज तिला थांबायचंच नव्हतं. ती रागाने धूमसत होती. तिचं लक्ष जवळच खुंटीला अडकविलेल्या चामडी पट्ट्याकडे गेलं. बहूधा विनयचा बेल्ट होता तो. तिने पुढे होत तो बेल्ट घेतला. विनयनं मान थोडी वर करत ते पाहिलं. तो आणखीनच घाबरला. आता बोलायला हवं असं त्याला वाटलं.

“शर्ट काढ.” सविताने आज्ञा केली.

“प्लीज मला बेल्ट ने मारु नकोस” विनयने विनविले.

“शर्ट काढ म्हंटलं ना” सविता कडाडली

“प्लीज माझं जरा ऐकून घे ना” विनयने आर्जव केलं.

सविता ने बेल्ट हवेत फिरवून जमिनीवर मारला. बेल्टचा सपकन आवाज झाला. आता सविता काहीच ऐकणार नाही हे विनयने ताडले. पुढे काही न बोलता त्याने त्याच्या अंगावरचा टी शर्ट काढला. सविताने त्याला पलंगापाशी नेवून पलंगावर छाती टेकवून गुडघ्यावर बसवले.

तिने बेल्टचा पहिला फटका पुर्ण शक्तिनिशी मारला तसा तो कळवळला. त्याने डोळे घट्ट मिटून घेतले. आज शिक्षेत कसलीही सूट मिळणार नाही हे त्याला कळाले होते.

त्याच्या उघड्या पाठीवर बेल्ट पडू लागला. प्रत्येक फटका अतिशय जोराने येत होता. पाठीवर वळ उमटू लागले. पाच सात मिनटातच त्याच्या पाठीवर लाल-गुलाबी रंगाचे उभेआडवे अगणित वळ उमटले होते.

सविता मारायची थांबली.

“उठ” तिने फर्मावले. तो हुंदके देत उठला.

“किती दिवसांपासून चालू आहे हे”

त्याने काहीच उत्तर दिले नाही. तसा तिने पुन्हा एकदा बेल्ट फिरवला. यावेळी बेल्ट्चा फटका त्याच्या उघड्या दंडावर पडला.

“काय विचारते आहे मी ? किती दिवसांपासून आहे हे व्यसन ?कुणाच्या संगतीने लागलं ?”

तो कसेबसे रडू आवरण्याचा प्रयत्न करु लागला. तिने चिडून पुन्हा दंडावर बेल्टने फटका दिला.

“आजच ओढली मी पहिल्यांदा. फक्त बघायची होती” तो कसेबसा बोलला

“पाकिट आणलं असेल ना सिगारेटचं ? दाखव मला”

त्याने बाजूच्या ड्रॉवरमधून पाकिट काढून तिच्या हातात ठेवले.

तिने पाकिट उघडले. त्यात चार सिगारेट होत्या.

ती फिरुन विनयच्या मागे उभी राहिली आणि पुन्हा त्याच्या पाठीवर बेल्ट पडू लागला

“त्यात फक्त चार सिगारेट्स आहेत आणि तु फक्त एकच ओढलीस. खोटं बोलतो माझ्याशी..” असं म्हणत तिने अजून पाच सहा फटके दिले. पण पाठीवर नवीन वळ दिसायला जागाच नव्हती.

त्याने कसबसं रडू आवरत बोलायचा प्रयत्न केला

“मॅम प्लीज मारु नका. प्लीज मॅम मी खरं सांगतोय”

पण तिला जणू थांबायचंच नव्हतं. पाठीनंतर पायांवर बेल्ट पडू लागला. विनय घरी असतान अनेकदा नाईट पॅन्ट आणि टी-शर्ट वापरत असे. पातळशा नाईट पॅन्ट मधून फटके पायांवर पडू लागले. ते फटके सहन करण विनयला खूपच कठीण होतं

“मॅम प्लीज… प्लीज मॅम” म्हणत तो ओरडू लागला.

दहा-बारा फटके मारुन सविता थांबली.

“मॅम ते बाबांच पाकिट आहे. बाबा सिगारेट ओढतात.मला खूप कुतुहल वाटायचं पण ओढून बघायची हिम्मत झाली नाही कधी. पण आज हिंमत केली. मी नाही ओढणार सिगारेट कधी. मला फक्त बघायची होती एकदा”

“काका सिगारेट ओढतात ?” सविताने अविश्वासाने विचारले.

“हो. मी खरं सांगतोय. हवं तर तु आईला विचार.”

“हं..”

“खरंच मॅम. व्यसनी मित्रांची संगत नाही मला. मला फक्त कुतुहल वाटलं”

“पण मी तुला विचारलं तेव्हा तु आधी खोटं का बोललास ?”

“मॅम मी घाबरलो होतो.”

“हं… हे बघ. काका मोठे आहेत. त्यांना त्यांचा नोकरी-व्यवसाय करताना काही चुकीची सवय लागली असेल. पण म्हणून तु त्यांच अनुकरण करायचं हे बरोबर नाही.”

“सॉरी मॅम. मी पुन्हा नाही ओढणार. खरंच नाही” विनय हुंदके आवरत म्हणाला.

सविता आता शांत झाली होती.

“ठीक आहे. डोळे पुस. आणि रडू नकोस आता”

विनयने मानेनेच होकार दिला.

सविता घरी जायला निघाली.

तिचं डोकं सुन्न झालं.  ती बगिच्यातल्या बाकावर बसून विचार करु लागली.

“विनयचे बाबा घरात सिगारेट ओढतात आणि त्यामुळे त्याला कुतुहल निर्माण झाले तर तो त्याचा दोष नाही होवू शकत. मी त्याला फारच कठोरपणे शिक्षा केली. तो खूप दुखावला गेला असेल. आज मावशी पण घरी नाही. जर वेदना असह्य होवून त्याला काही झालं तर. कदाचित ताप पण येवू शकतो. नाही, मी त्याला आता अशी एकट्याला सोडू शकत नाही.”

त्या विचाराने ती एकदम उठली आणि विनयच्या घरी गेली. विनयने दार उघडले.

तिला काय बोलाव ते सुचत नव्हतं. त्याचा रडवेला चेहरा पण बघत नव्हता. तो पलंगावर बसला. ती त्याच्याजवळ गेली. तिने त्याच्या डोक्यावरुन हात फिरवला.

“तु का आलीस पुन्हा ? मी पुन्हा सिगारेट ओढतोय का ते बघायला ?”

“नाही रे”

“मग. अजून मारायचं आहे का ? घे तो बेल्ट आणि मार अजून मला. मी खूप वाईट मुलगा आहे ना.”

“खूप लागलं ना रे. मी तुझ्या पाठीला मलम लावते.”

“काही नको.”

“प्लीज. असं नको करुस. मला माहितीये मी खूपच जास्त कठोरपणे वागले. सॉरी..खरंच सॉरी.”

तिने मलमाची ट्यूब आणली.

“विनय शर्ट काढ बरं”

विनयने निमुटपणे शर्ट उतरवला.

तिने हलक्या हाताने त्याच्या पाठीवर मलम लावले. थंड मलम आणि तिच्या हाताचा अलगद स्पर्श यामुळे त्याला थोडं बरं वाटू लागलं.  दाह थोडा कमी झाला होता.

“तु काही खाल्लस ? भूक लागली असेल ना तुला” तिने विचारलं

“हो. खूप खाल्लं आज…” त्याच्या उत्तराचा अर्थ आणि त्याची नाराजी तिला समजली. काही न बोलता ती किचन मध्ये गेली.

क्षणभर विचार करुन तिने त्याच्या आवडीची कांदा भजी बनवायला सुरवात केली.

थोड्याच वेळात कांदा भजी घेवून ती विनयच्या खोलीत गेली.

“ए विनय. बघ कांदा भजी केलीत मी. तुला आवडतात ना”

तो काहीच बोलला नाही.

“विनय, ऐकतोयस ना माझं” विनयनं मान वर केली. रडून त्याचे डोळे सुजले होते. त्याला तसं पाहून तिचा कंठ दाटून आला. तिने त्याल जवळ घेतले. त्याचं डोकं कुरवाळत ती रडू लागली.

“विनय खरंच चुकले रे मी. मी इतकी कठोर कशी झाले तेच मला कळत नाही. अजूनपर्यंत अमेयला कितीही मस्ती केली तरी दोनपेक्षा जास्त धपाटे कधी घातले नाहीत मी. मग तुझ्याबाबात इतकी का कठोर झाले तेच समजत नाही. ते पण माझा तसा काही अधिकार नसताना”

“नाही मॅम. अधिकार आहे तुमचा. तुम्ही मला शिक्षा केलीत म्हणून मला राग नाही आला. पण खरंच खूपच जास्त होती ती. तुमचे फटके मला सहन करणं खूप कठीण होतं”

“बरं आता शांत हो. खावून घे. आणि पुन्हा मॅम काय म्हणतोस मला”

भजी खावून झाल्यावर सविता म्हणाली

“मावशी आज येणार नाहीत ना ? तु आमच्या घरी ये आज. तिथेच झोप.”

“नको. आईने काहीतरी बनवलं असेल माझ्या जेवणासाठी”

“असू दे ते. पण तु माझ्याबरोबर चल. अमेय च्या खोलीत झोप. रात्री ताप आला तुला तर… तुला आज एकट्याला इथे नाही सोडू शकत मी. चल तू”

विनय तिच्यासोबत गेला.

रात्रीचं झोपण्यापुर्वी तिने त्याला गरम दूध हळद घालून दिले.

“हे कशाला ? मला नाही सवय” विनय म्हणाला

“अरे चांगलं असतं, घे. तुझं अंग दुखत असेल. रात्री वेदना वाढू शकते”

रात्री तिला काही झोप लागत नव्हती. पुन्हा पुन्हा तेच विचार डोक्यात येत होते. विनयची काळजी पण वाटत होती. रात्री काही वेळा उठून ती विनय ठीक आहे ना याची खात्री करुन घेत राहिली.

०———–०

दिवस सरत गेले. सविताचे मुंबईला जाणे दोनच दिवसांवर येवून ठेपले. तिने विनयला भेटायला बोलावले.

घरापासून आणि विनयपासून दूर जाण्याच्या विचाराने ती हळवी झाली होती.

“विनय मी परवा चालले रे, तु काळजी घे स्वत:ची”

“हं.. हे तर मला बोलायला हवं. तु दूर चालली आहेस. आणि दूर जावून मला विसरणार नाहीस ना”

“ए वेड्या, तुला कशी विसरेन. आणि येत राहीन ना मी घरी प्रत्येक महिन्याला. तेव्हा भेटूच ना”

“मी तुझ्यासाठी काहीतरी आणलंय” असं म्हणत तिने एक नवा मोबाईल चा बॉक्स त्याच्या समोर धरला.

“. मोबाईल…अरे व्वा..” विनय आनंदला. बारावीपर्यंत कॉलेज मध्ये मोबाईल ला परवानगी नसल्याने त्याने घेतला नव्हता.

“साधाच आहे रे. माझ्या पॉकेटमनी मधून घेतला आहे. पण पुढे मी अजून चांगला मोबाईल देईन तुला”

“छान आहे गं हा..थॅंक्स.”

“विनय. मी काही वेळेस तुझ्याशी खूप कठोर वागले रे. तुला राग आला असेल ना माझा” त्याचा हात हातात घेत ती म्हणाली.

“नाही गं. कधीच नाही आला. खरच नाही.”

दोघांकरिता ते खूप हळवे क्षण होते.

(प्रकरण समाप्त)

प्रकरण चार

सविता मुंबईला नोकरीत रुजू झाली. विनयचे पण कॉलेजचे दिवस चांगले चालले होते. फोनवरुन ते नेहमीच संपर्कात असायचे. तसेच सविता महिन्यातून एक दोनदा घरी यायची तेव्हा विनयला भेटत असे.

दिवस सरत गेले. विनयचे बी. एस्सी. चे तिसरे म्हणजेच शेवटचे वर्ष होते.

०———०

एकदा सविता घरी आली असताना दोघे बगिच्यात भेटले.

“सविता, मागच्या आठवड्याची एक गंमत सांगायची आहे तुला. तुझी त्यावेळी आठवण झाली”

“का रे काय झालं ?”

“अगं माझी एक जवळची मैत्रीण आहे, पल्लवी नावाची. माझी क्लासमेट आहे”

‘जवळची मैत्रीण’ शब्द ऐकून सविता च्या काळजाचा ठोका चुकला. श्वास रोखून ती ऐकू लागली.

“म्हणजे माझ्या ग्रुप मध्ये आहे ती पहिल्या वर्षापासून. आणि तिचा बॉयफ्रेंड आहे अनिकेत. तो पण क्लासमेट आहे आणि काही काळापासून तो पण आमच्या ग्रुप मध्ये आहे.”

पल्लवीच्या बॉयफ्रेंडबद्दल ऐकून सविताला हायसे वाटले.

“त्या अनिकेत ची एक वाईट सवय आहे. आमचा सगळ्यांचा मिळून काही पण बेत असला की साहेब नेहमी उशिराने उगवणार. त्याच्यामुळे आमची दोन-तीनदा सिनेमाची सुरवात चुकली. पार्टी , सहल काही असलं तरी हा एकटाच उशीर करणार”

“हं..”

“त्याला चार सहा वेळेस सांगितलं तरी त्याचं तेच. कधी त्याचा पल्लवीशी किंवा इतरांशी त्यावरुन वाद व्हायचा”

“बरं मग ?”

“मागच्या आठवड्यात पल्लवीचा वाढदिवस होता. सगळ्यांना तिने पार्टी द्यायचं ठरलं होतं. रेस्टॉरंट मध्येच केक कापून मग जेवण असा बेत होता. “

“हे महाशय उशिरा आले असणार”

“उशीर ? अगं पुर्ण पाऊण तास उशीर. आम्ही मोबाईल वर फोन करत होतो तर फोन पण उचलेना. बाईक वर येणार होता. त्यामुळे पल्लवीला अजूनच चिंता. म्हणजे तसे आम्ही सगळेच काळजी करत होतो. आणि निदान त्या दिवशी तरी तो उशीर नाही करणार असं वाटत होतं म्हणून अजूनच काळजी वाटत होती. कसंबसं आम्ही तिला धीर देत होतो.”

“हं…”

“मग अनिकेत आला.”

“का उशीर झाला होता ?”

“अगं ते तर आधी सांगायलाच तयार नव्हता. सगळ्यांनी जास्तच विचारलं तेव्हा सांगितलं की आमच सात वाजता भेटायचं ठरलं होतं आणि हा समजत होता की आठ वाजता भेटायचं आहे म्हणून. मग आमचे फोन येवू लगलेत तेव्हा त्याने पुन्हा एसएमएस बघितला. आणि मग निघाला”

“ग्रेट आहे रे तुझा मित्र. आणि फोन का नव्हता उचलत ?”

“त्याला आम्हाला समजू द्यायचं नव्हत की तो अजून निघालाच नव्हता ते. फोनवर आम्ही विचारलं असतं ना.”

“हा हा. मग पल्लवीनी तासंलं असेल त्याला.”

“सगळे तर रागावलेच होते. पण पल्लवी आता किती रागावते याकडे सगळ्यांच लक्ष लागलं”

“मग काय केलं तिने ?”

“ती त्याच्याकडे बघायला पण तयार नव्हती. त्याने तिला विश करायला हात पुढे केला तरी तिने प्रतिसाद नाही दिला. तो अनेकदा सॉरी म्हणाला.”

“मग ?”

“आम्हाला वाटलं ती खूप सुनावेल त्याला आणि मग माफ करेल. पण तिने त्याला एकदम शांतपणे कान पकडून उठाबशा काढायला सांगितल्या. पाऊण तास उशिरा आला म्हणून चाळीस उठाबशा, पाच मिनटं माफ केली असं ती म्हणाली. सगळे आधी हसायला लागले. पण ती एकदम ठाम राहिली. त्याने तिला विनवून पाहिले पण तिने शिक्षा मागे घेतली नाही की कमी पण केली नाही. अखेर त्याने रेस्टॉरंट मध्ये चाळीस उठाबशा काढल्या. आम्ही सगळे अवाक झालो. तिथले इतर लोक पण बघून हसत होते. आमच्या ग्रुपमध्ये अजून दोन असे कपल्स आहेत. आता त्या मुलीपण त्यांच्या बॉयफ्रेंड ला धमकी देतात की नीट वागला नाहीस तर तुला पण अनिकेतप्रमाणे शिक्षा मिळेल..”

“सही रे.. आणि तुला का रे माझी आठवण झाली ?”

“मग मला दहावीत मिळालेल्या शिक्षांची आठवण अजून तशी ताजीच आहे ना ?”

“असं का ? पण तेव्हा तू माझ्याकडे ट्यूशन ला यायचास. होमवर्क नाही केलास तर तुला शिक्षा मिळायची”

“आणि दोन वर्षापुर्वी बेल्टने फोडून काढले होतेस ते. आठ-दहा दिवस वळ गेले नव्हते माहीत आहे का ?”

“फक्त आठ दिवस का ? मला वाटलं महिनाभर राहिले असतील…आणि तु काय रोज आरशात वळ बघत होतास का ?” सविताने हसून विचारले.

“हो ना. आधी एक दोन दिवस खूपच वाईट वाटत होतं इतकी शिक्षा मिळाली म्हणून पण नंतरचे पाच-सात दिवस छान वाटायचं आरशात ते वळ बघून.”

“हो का ? मग वळ गेल्यावर तर खूप वाईट वाटलं असेल रे तुला?” तिला हसू आवरलं नाही.

“हो गं. खरंच वळ दिसेनासे झाल्यावर मी ते मिस करु लागलो”

“अरेरे.. मग सांगितलं का नाहीस मला तसं. पुन्हा एकदा फोडून काढलं असतं ना मी.”

“चुकलंच माझं. आता घरी आलीस की मला फोडून काढत जा”

“वा रे शहाण्या..आता मोठा आव आणतोस. त्यावेळी तर कसला घाबरला होतास ? मान खाली घालून रडत होतास फक्त. मलाच मग दया आली. आणि तुझी समजूत पण मला काढावी लागली.”

“अगं ती पहिलीच वेळ होती ना इतका मार खायची. आता नाही घाबरणार”

“नको मग. राहू देत. तु घाबरला नाहीस तर मला मजा नाही येणार रे”

दोघे मोठयाने हसू लागले.

“पण तशी ही कल्पना मस्त वाटते रे. मी माझ्या बॉयफ्रेंड ला नियमितणे चाबकाने फोडून काढेन. आणि तो मला घाबरुन राहील. सही..” सविता हसत म्हणाली.

“तुझा बॉयफ्रेंड आहे ?” विनयने गडबडून विचारले

“चूप रे. आता नाहीये कुणी. पण कधीतरी भेटेल ना भविष्यात”

“कोण हिम्मत दाखवणार तुझा बॉयफ्रेंड बनण्याची..”

“ते बघू नंतर…बरं विनय, कान पकडून तीस उठाबशा काढ”

“काय ? कशासाठी?”

“असंच. तुझा किस्सा ऐकून आता माझ्या पण आठवणी जाग्या झाल्यात. आणि नुसत्याच शब्दांनी आठवणी काय जागवायच्यात ना. म्हणून आपण आता कृतीने जागवूयात”

“बापरे म्हणजे उगाच सांगितला म्हणायचा तुला किस्सा”

“ए गप रे. तसं पण मी तुला शिक्षा दिल्यात त्या माझ्या किंवा तुझ्या खोलीत. दुसरं कुणी नसताना. आजं बगिच्यात शिक्षा करते. तुझ्या मैत्रिणीनं कशी रेस्टॉरंट मध्ये दिली शिक्षा.”

“काही खरं नाही माझं. माझ्या इज्जतीचा फालूदा करायचा ठरवलंस तर”

“काही फालूदा होत नाही. इथे आता खूप लोक नाहीत आणि काय म्हणतील लोक, त्यांना तर वाटेल किती आज्ञाधारक मुलगा आहे, मैत्रिणीनं शिक्षा केली तर निमुटपणे घेतो”

“ते तर मी आहेच. कधीच मी तुला उलटून काही विचारलं नाही ..”

“हो रे माझ्या शहाण्या बाळा.. म्हणून तर तू मला खूप आवडतोस. आता पटकन उठाबशा काढ बरं”

“ओके मॅम” म्हणत विनयने कान पकडले आणि पटकन उठाबशा काढल्यात.

“छान. शहाणा मुलगा आहेस हं” सविता हसून म्हणाली.

०———०

बी. एस्सी. चं वर्ष संपल्यावर विनयनं एम एस्सी ला प्रवेश घेतला.  दोघे पुर्वीप्रमाणेच महिन्यातून एक दोनदा भेटायचे. सविताला घरी येताना घरच्यांच्या भेटीप्रमाणेच विनयच्या भेटीची पण ओढ लागून रहायची. आणि विनय पण तिच्या येण्याची आतुरतेने वाट पहायचा. क्वचित एखाद्या वेळेस अचानक काही काम निघाल्याने तिचे येणे रद्द झाले की तो नाराज व्हायचा. मग तिला त्याची समजूत घालावी लागायची. बहूधा अशी समजूत घालण्यासाठी ती सिनेमाचा किंवा बाहेर जेवायला जाण्याचा बेत बनवायची.

आता विनय एम. एस्सी च्या दुस-या वर्षाला होता.

दोघे सविताच्या  घरी भेटले असताना विनयने घाबरत विचारले

“सविता. एक सांगायचं होतं.”

“बोल ना रे”

“तु रागावशील..”

“काळजी करु नकोस. त्याची तुला सवय आहे” ती हसू लागली.

“मागच्या आठवड्यात पार्टीत मी थोडं ड्रिंक घेतलं”

“अच्छा ? काय प्यालास ?”

“व्हिस्की”

“किती पेग ?”

“जास्त नाही एक-दीड”

“हं.. स्वत:च्या इच्छेने प्यालास की मित्रांनी आग्रह केला म्हणून”

“खरं तर मलाच इच्छा होत होती चाखायची. पण हिंमत होत नव्हती. मित्रांनी पण थोडा आग्रह केला , मग जरा हिंमत झाली”

“हं”

“पण तरी भिती वाटत होती की तु काय म्हणशील म्हणुन”

“हे बघ विनय. मागे मी तुला सिगरेट ओढलीस म्हणून शिक्षा केली होती. त्यावेळी तु अठरा वर्षांचा पण नव्हतास. तु आता मोठा झाला आहेस.  तु दारु प्यायचीस की नाही ते मी ठरविणार नाही”

“प्लीज असं नको म्हणूस. राग आला असेल तर रागव. त्यावेळप्रमाणे फोडून काढ हवं तर”

“नाही रे वेड्या. खरंच मी नाही रागवले. हो पण एक सांगेन की तु मित्रांच्या सांगण्याने किंवा आग्रहाखातर दारु घेवू नकोस. कारण मग तुझे स्वत:वर नियंत्रण राहणार नाही. तुला इच्छा झाली तरच फक्त घे. बरं मला सांग तुला कसं वाटलं दारु पिवून ?”

“खरं सांगायचं तर, छान वाटलं. थोडं हलकं हलकं वाटलं”

“बरं मग तु घेवू शकतोस. पण तु अजुन विद्यार्थी आहेस. तेव्हा महिन्यातून फक्त एकदाच आणि दोन पेक्षा जास्त पेग नाही. आणि सिगरेट पासून मात्र नेहमीच दूर रहा.”

“थॅंक्स सविता. मी महिन्यातुन दोन पेग पेक्षा जास्त नाही पिणार”

तिचं मत, तिचे निर्णय, तिचं रागवणं सगळंच त्याच्यासाठी खूप महत्वाचं होतं. त्याच्यांत दाट मैत्री होती, जिव्हाळा होता. पण आता सविताला एक नातं हवं होतं मैत्रीपलीकडचं. खूप काळापासून ती त्याची वाट पहात होती.

(प्रकरण समाप्त)

प्रकरण पाच

विनयने एम एस्सी पुर्ण केलं. आता तो नोकरीची संधी शोधू लागला. सवितानं त्याला सुचवलं की “तु मुंबईत ये. आणि इथे राहूनच नोकरी शोध. इथे तुला चांगली संधी नक्की मिळेल. मी जिथे रहाते तिथून जवळच एका बिल्डिंगमध्ये माझे इतर काही मित्र रहातात. मी त्यांना विनंती करेन, तु त्यांच्या सोबत रहा.”

विनयला पण हे योग्य वाटलं. तसं पण मुंबईला सविताच्या जवळपास रहायला मिळेल याचा त्याला खूप आनंद झाला.

सविता नैना नावाच्या एका मैत्रिणीसोबत एका फ्लॅट मध्ये रहात असे. समोरच एका बिल्डिंग मध्ये तिचे काही जुने सहकारी आणि मित्र राहायचे. त्यांच्यासोबत तिने विनयच्या रहाण्याची सोय केली.

विनय जरी त्यांच्यासोबत रहात होता तरी अनेकदा सविता च्या घरी असायचा. ती त्याला नोकरी शोधण्याच्या कामात मदत आणि मार्गदर्शन करत असे. रात्रीचे जेवण त्याने सविताच्या घरीच करावे असे तिने सुचवले. नैना ने पण त्याला दुजोरा दिला. नैना आणि विनय यांची पण लवकरच मैत्री झाली. नैना सायंकाळी लवकर घरी यायची आणि मग तिघांसाठी स्वयंपाक करायची. तर जेवणानंतर सविता विनयशी गप्पा मारत उरलेली कामे करायची. सुटीच्या दिवशी ते तिघे आणि नैना चा प्रियकर राहूल  असे सगळे मिळून कधी सिनेमाचा तर कधी बाहेर फिरायला जाण्याचा बेत बनवत. दिवस मजेत जात होते.

पण विनयच्या नोकरीच्या  शोधात फारशी प्रगती होत नव्हती. तो निराश होवू लागला. सविता कडे ही निराशा त्याने बोलून दाखवली. तसं तिने त्याला समजावलं

“अरे तु खूप हुशार आहेस. एक चांगला संशोधक बनायची तुझी कुवत आहे. तुला चांगली संधी नक्की मिळेल. कधी कधी अशा गोष्टी लगेच घडून येतात तर कधी थोडा वेळ लागतो. पण म्हणून मनाला का लावून घेतोस. सध्या तुझ्याकडे खूप वेळ आहे तर भरपूर मजा कर. नवीन काही शिक, मुंबई फिरुन घे. एकदा नोकरी मिळाली की फारशी सवड मिळणार नाही”

“ते आहे गं. पण कशात मन रमत नाही.”

“अरे हो. तुला व्हॉलीबॉल खेळायला आवडतं ना. इथे जवळच एका ठिकाणी एक ग्रुप आहे खेळणारा. त्यात माझा एक मित्र पण आहे. मी तुझी ओळख करुन देते त्याच्याशी. तु खेळत जा मग तुझं मन रमेल”

व्हॉलीबॉल बद्दल ऐकताच विनयच्या अंगात उत्साह संचारला.

तो रोज सायंकाळी व्हॉलीबॉल ग्रुप मध्ये खेळायला जावू लागला. खेळून साडेनऊ च्या दरम्यान सविताकडे जेवायला जायचा.

०——०

नैनाने एकदा सविताकडे विषय काढला

“काय गं , तुझ्यात आणि विनयच्यात नेमकं काय आहे ? म्हणजे चालेल ना विचारलं तर ?”

“अगं त्यात काय न चालण्यासारखं. तु माझी जवळची मैत्रीण आहेस की”

“मग सांग ना, आता म्हणू नकोस की ’हम सिर्फ अच्छे दोस्त है’” आणि दोघी खळाळून हसल्या.

“अगं नाही म्हणणार. पण नेमकं म्हणू तरी काय हा प्रश्नच आहे की … हे बघं तो मला खूप आवडतो. अगदी अनेक वर्षांपासून. त्यालाही मी आवडते”

“पण मग तुम्ही बॉयफ्रेंड-गर्लफ्रेंड सारखे तर वागत नाही कधी”

“नाही ना.. आमच्यात अजून असं काही नातं नाही निर्माण झालं.”

“का बरं ?काय अडचण आहे. आता तो बोलत नसेल, प्रपोज करत नसेल तर तू करुन टाक ना”

“प्रश्न तो नाही गं. माझं त्याच्यावर प्रेम आहे आणि त्याचं ही माझ्यावर आहे याची मला खात्री आहे. पण तो माझ्यापेक्षा पाच वर्षांनी लहान आहे. आणि हे प्रेम त्याला नीट जाणवले, समजले आहे की नाही याची मला खात्री नाही. शिवाय आता सध्या तो नोकरीच्या चिंतेत आहे .”

“हं.. सविता. अजून एक विचारु”

“अगं बोल ना. “

“तुमच्यातली केमिस्ट्री थोडी वेगळीच वाटते ग. म्हणजे तो तुझा आदर करतो ते ठीक आहे पण काही वेळा तुझ्या बोलण्यात थोडी जरब असते, थोडा धाक असतो. आणि तु असा थोडा धाक दाखवला की तो लगेच नरम होतो…. घाबरतो की काय तो तुला ? अर्थात हे मी तुम्हाला जवळून बघते म्हणून मला जाणवलं. ”

“हं.. हो तसं आहे थोडं आमचं” सविताला हा प्रश्न अनपेक्षित असल्याने ती थोडी गोंधळली.

“तो तुझ्यापेक्षा लहान असल्यामुळे का ?”

“म्हंटलं तर हो.. म्हणजे आमची सुरवात काहीशी तशीच झाली. मी त्याची ट्युशन्स घ्यायचे तो दहावीत असताना. मग कधी रागवायचे, होमवर्क नाही केला तर शिक्षा पण द्यायचे. कधी उठाबशा तर कधी छडीचे फटके पण मिळालेत त्याला”

“ओह.. बापरे… मग तीच केमिस्ट्री अजून आहे की काय , म्हणजे अजूनही तू शिक्षिकेच्या आणि तो आज्ञाधारक विद्यार्थ्याच्या भुमिकेत आहे का?”

“नाही गं. मी त्याच्या ट्युशन्स सुरु करण्या आधी्पासूनच आम्ही चांगले मित्र बनलो होतो. ट्युशन्स चालू असताना मात्र तो मला ’मॅम’ म्हणायचा. पण त्याचं दहावीचं वर्ष संपल्यानंतर पुन्हा आम्ही मित्र म्हणूनच भेटु लागलो. फिरायला जायचो. कधी डिनर, कधी सिनेमा. खूप मस्ती पण करायचो. थट्टा मस्करी, रुसवे फुगवे पण असायचे. वयातील फरक आमच्या मैत्रीत कधी अडचणीचा ठरला नाही.”

“बरं पण मग ..?”

“पण कुठेतरी मनाच्या एका कोप-यात त्याच्यावर वर्चस्व गाजविण्याची भावना माझ्या मनात नेहमीच राहिली.”

“पण तु म्हणतेस की तुझं त्याच्यावर प्रेम आहे. आणि मग वर्चस्व गाजवणे वगैरे.. हे कसं”

“ते आमच्या प्रेमाचं एक वेगळेपण आहे. एक वैशिष्ट्य आहे. मला त्याच्यावर काहीसं वर्चस्व गाजवावं वाटतं. मला प्रेमात त्याच्याकडून समर्पण हवं असतं. आणि त्यालाही मला अशा प्रकारे समर्पित करायला आवडतं. माझ्या वर्चस्वापुढे शरण जायला आवडतं. किंवा त्यापुढे जावून असंही म्हणता येईल की या दोन्हीही गोष्टि आमच्या मानसिक गरजा आहेत आणि त्या एकमेकांना पुरक आहेत.”

“तुला खात्री आहे याची ? कारण एक ट्युशन टीचर म्हणून किंवा एक वयानं मोठी, सिनियर मैत्रीण म्हणून तुझं वर्चस्व जरी त्याने मान्य केलेलं असलं तरी एका प्रेयसीचं असं वर्चस्व गाजविणं तो मान्य करेल ? मला नाही वाटत. राहूलचं बघते ना मी, खूप प्रेम करतो तो माझ्यावर. पण मी एखाद्या गोष्टीत थोडा जरी अधिकार गाजवू पाहिला, किंवा त्याला तशी नुसती शंका जरी आली तरी चिडतो. मग मलाच माघार घ्यावी लागते.”

“नैना. प्रत्येक नात्याच स्वत:च असं वैशिष्ट्य असतं, एक वेगळेपण असतं, केमिस्ट्री असते म्हण”

“मान्य. पण तरी तु इतकं खात्रीने कसं म्हणू शकतेस? तुला स्वत:बद्दल तरी खात्रीने वाटतंय का की तुला ही केमिस्ट्री नक्कि हवी आहे ?  तुझ्या प्रियकराने तुझं अंकित असणं तुला नक्की आवडेल ?”

“हो. मला खात्री आहे. तो. बी. एस्सी. च्या पहिल्या वर्षाला असताना मला इकडे नोकरी लागली. त्याला सोडून जाण्याच्या कल्पनेने मी अस्वस्थ होते. मी निघण्यापुर्वी आमच्यात काहीतरी विलक्षण घडावं असं मला वाटत होतं. काय ते मात्र कळत नव्हतं. आणि मग एका सायंकाळी त्याच्या एका चुकीसाठी मी त्याला बेल्टने मारलं होतं. मारलं काय, फोडून काढलं होतं म्हणता येईल. त्याच्या पाठीवर कित्येक वळ उमटले होते. ”

“बापरे.. अगं काय सांगतेस ?माझा तर विश्वासच नाही बसत.. इतकी कठोर कशी काय झालीस तु ? आणि असं काय केलं होतं त्याने म्हणून तु इतकी रागावली होतीस ?”

“अगं तेच तर मी सांगतेय ना. आता विचार केला तर जाणवतं की त्याची चुक अशी फारशी मोठी नव्हतीच. ते फक्त एक निमित्त मिळालं होतं मला. त्याच्यापासून दूर जाण्यापुर्वी माझ्या मनातल्या प्रेमातील वर्चस्वाच्या भावनेचा एक अविष्कार व्हायचा होता. मला मान्य आहे की हा अविष्कार फार जास्त तीव्र होता. पण त्या क्षणी ती मानसिक गरज होती, माझी आणि त्याची पण. तो मला सहजच विरोध करु शकला असता. पण त्याने तसं केलं नाही. मान खाली घालून निमुटपणे फटके झेलत होता. किंवा इतकी कठोर शिक्षा मिळाल्यावर पण तो माझ्याशी भांडला नाही. माझ्याशी चिडून बोलला नाही. तुला काय वाटतं, एका शिक्षिकेकडून त्याने इतकी कठोर शिक्षा स्विकारली असती ? त्याने स्वत:ला त्यावेळी माझ्यापुढे समर्पित केलं होतं. ते समर्पण एका विद्यार्थ्याचं नक्कीच नव्हतं तर एका प्रियकराचंच होतं”

“सविता तु खूप विचार केलेला असेल यावर नक्कीच. माझ्यासाठी हे सगळं नवीन आहे. तरी पण हे थोडं विचित्र वाटतं आहे. म्हणजे एखाद्याला ते पण प्रियकराला अशा प्रकारे गुलाम बनवणं म्हणजे..”

“चुकतेयस तु नैना… तो माझा गुलाम नाही. आमचं प्रेम अजून अव्यक्त आहे. पण ते व्यक्त झाल्यावरही तो माझा गुलाम कधीच नसेल. तो एक स्वतंत्र व्यक्ती आहे. मी त्याचं स्वातंत्र्य हिरावून घेणार नाही. किंवा त्याचा अगर त्याच्या भावनांचा कधी अपमान पण माझ्याकडून होवू नये असेच मला वाटते. मी पण त्याचा खूप आदर करते. हो , पण मला त्याचे समर्पण हवे आहे. प्रेमातले समर्पण. आणि हे आमच्या दोघांसाठी चांगलंच असेल. या समर्पणाचा गैरफायदा मी कधीच घेणार नाही. त्यामुळे आमच्या नात्यात विधायक गोष्टी घडतील. आणि तो कधी चुकत असेल तर मला त्याला चुकीच्या मार्गावर जाण्यापासून रोखता येईल”

“आणि हे बेल्टने मारणं , फोडून काढणं वगैरे ..?”

“अगं तुला म्हंटला ना मी तो आमच्या भावनांचा एक खास, नाट्यमय आणि तीव्र असा अविष्कार होता. असा अविष्कार फार क्वचित होवू शकतो. जेव्हा तशी आमची मानसिक गरज असेल ,किंवा आमच्यातल्या नात्याची ती गरज असेल तेव्हा. पण तो काही चुकीचं किंवा बेजबाबदारपणे वागला तर मात्र त्याला थोडीफार शिक्षा मिळत राहील. मला वाटतं आता ती वेळ जवळ आली आहे. एक-दोन दिवसातच मला हातात छडी घ्यावी लागणार आहे”

“का गं. आता काय केलं त्याने. बिचारा शहाण्यासारखा तर वागतो ना नेहमीच”

“हं. .. रोज व्हॉलीबॉल खेळून साडे नऊला येतो. मी त्याला तीन चार वेळा सांगून समजावून झालं की नऊ वाजेपर्यंत तरी येत जा आम्ही जेवायला थांबतो, आम्हाला आवरायला उशीर होतो, नैना ला सकाळी लवकर जायचं असतं. हा रोज म्हणतो की उद्यापासून येईन लवकर आणि पुन्हा दुस-या दिवशी तेच. आता छडीनेच समजवावं लागेल. मग बघ कसा एकदम सरळ होतो ते”

“हं.. थोडं रंजक वाटू लागलंय मलाही हे. ए मला बघायला मिळेल का ? म्हणजे माझ्यासमोर तु त्याला शिक्षा करशील का ?”

“हो चालेल. तु माझी खास मैत्रीण आहेस. त्यामुळे चालू शकेल. पण तु हे कुणालाही कधीच सांगायचं नाहीस. अगदी राहूल ला पण नाही”

“नाही गं. कधीच नाही सांगणार. पण मला सांग नक्की कसा वाटतो गं हा अनुभव. म्हणजे तु छडी घेवून त्याला शिक्षा करतेस तेव्हा तुला नेमकं कसं वाटतं”

“असं शब्दांत सांगणं कठीण आहे. फार विलक्षण असतो तो अनुभव. तुला तो समजायचा असेल तर तुला स्वत:लाच अनुभवावं लागेल”

“छे गं. मला शक्यच नाही ते कधी राहूलबरोबर. तसं पण मला अशा प्रकारचं नातं माझ्या आयुष्यात  नको आहे, पण फक्त उत्सुकता निर्माण झाली की नेमकं कसं वाटत असेल”

“हं..” सविता विचार करु लागली.

०——०

एक दोन दिवसानंतरची गोष्ट. सविता सायंकाळी थोडी लवकर घरी आली होती. तिने विनयला फोन करुन बोलावले.

“विनय, खेळायला जाताना माझा हा ड्रेस इस्त्रीकरिता आपल्या सोसायटीसमोरच्या लॉंड्रीत दे. त्याला लगेच इस्त्री करुन ठेवायला सांग. आणि नऊ वाजता तो लॉंड्री बंद करतो. तर त्या आधी जावून ड्रेस घे आणि घरी ये”

“ठीक आहे”

“”नक्की, न विसरता आण बरं. उद्या मला हवा आहे हाच ड्रेस. आणि आता नऊ वाजता घरी येत चल. रोजच खूप उशीर करतोस रे.”

“हो… हो. आज येईन नऊ पर्यंत”

“ उशीर केलास तर बघ हं.. आणि फक्त आजच नाही, रोजच नऊ पर्यंत घरी येत जा”

“हो.. आता जावू मी ?”

“हं.. जा”

विनय गेला.  सविता आणि नैना घरातली कामं करीत होते.

साडेनऊला विनय घरी आला

“सविता, तुझा ड्रेस नाही मिळाला इस्त्री करुन. लॉंड्री बंद झाली होती.”

“तु किती वाजता गेला होतास ?”

“नऊ वीस आणि पंचवीस च्या दरम्यान”

“अरे असा कसा रे तु ? तुला बोलले होते ना मी की नऊ वाजता लॉंड्री बंद होते म्हणून”

“हो..सॉरी. थोडा उशीर झाला” विनय ओशाळून म्हणाला.

सविता ऊठून आतल्या खोलीत गेली आणि छडी घेवून आली.

“तीस उठाबशा काढ” छडी उगारत ती म्हणाली.

विनय उठून उभा राहिला.

“सॉरी मॅम” तिच्याकडे पहात तो म्हणाला.

“उठाबशा काढ लवकर, उशीर होतोय जेवायला. ” तिने फर्मावले.

आता शिक्षेतून सुटका नाही हे त्याच्या लक्षात आले. त्याने कान पकडून उठाबशा काढल्यात.

“आता हात पुढे कर”

त्याने हात पुढे केला. तिने छडी उगारली तितक्यात नैना मध्ये बोलली.

“सविता, अगं आता अजून हे कशाला ?”

“नैना तु उगाच मध्यस्थी करु नकोस” सविताने नाराजीने म्हणाली.

“का नाही करणार मध्यस्थी मी ? आता ऊठाबशा काढल्यात ना त्याने, मग आता अजून छडी कशाला ?” नैना ने मध्यस्थी केली.

“उशीरा आला, म्हणजे तसा रोजच उशीरा येतो तो म्हणून उठाबशा. आणि लॉंन्ड्रीचं काम पुर्ण केलं नाही म्हणून छडीचे दहा फटके. अजून काही शंका नसाव्यात”

“अगं इतकी काय टीचर सारखी वागतेस ? मिळाली ना त्याला आता शिक्षा. पुन्हा नाही करणार तो असं” नैना ने सविताच्या हातातून छडी ओढून घेतली.

“वीस फटके…नैना, तु आता आणखी काही बोलशील तर मी त्याची शिक्षा वाढवत जाईन. छडी दे इकडे.”

“ए. काही काय गं तुझं? आलीस मोठी शिक्षा करणारी”

“तीस फटके . .छडी दे म्हंटलं ना” सविता ओरडली.

“नाही देत. जा काय करशील ?”

“नैना प्लीज. . तु नको मध्ये पडूस, मला शिक्षा घेवू देत..ती आता टळणार नाहीच. आणि माझ्यामुळे तुमच्यात वाद नको प्लीज” विनय म्हणाला.

नैना नरमली. त्या दोघांच्या मध्ये बोलण्यात काही अर्थ नाही हे तिच्या लक्षात आले. तिने सविताला छडी परत केली.

सविताने विनयच्या तळहातावर सपासप वार करायला सुरु केलं. प्रत्येक फटका अतिशय जोराने पडत होता. नैना हळहळली.  दहा फटके झाल्यावर ती म्हणाली.

“अगं निदान आता तरी थांब. तु दहाच फटके देणार होतीस ना, मग मी मध्ये बोलली त्याची शिक्षा त्याला कशाला ?”

“त्याचा विचार तु मध्ये बोलण्यापुर्वी करायला हवा होतास..”

“प्लीज सविता, अगं इतकं कठोरपणे वागणं ठीक नाही”

“आता शिक्षा कमी होणार नाही” सविता ठामपणे म्हणाली.

“बरं मग पुढचे फटके मी मारते त्याला. तसं पण शिक्षा माझ्यामुळे वाढली, तर मलाच ती देवू देत”

“पण हे विनयला चालत असेल तरच. कारण तो फक्त माझ्याकडूनच शिक्षा घेतो. विनय तुला चालेल का उरलेली शिक्षा नैना ने दिली तर?” सविता म्हणाली.

विनयला आजची शिक्षा अनपेक्षित होती. त्यातही सविता नैनाकडून फटके  घेण्याबद्दल सांगत होती. पण सविताने तसं सांगितलंय तर त्यामागे काहीतरी अर्थ असेल असा त्याने विचार केला.

“मॅम नैना मॅमकडून शिक्षा घ्यायला ही माझी हरकत नाही.”  नैनाच्या नावापुढे ‘मॅम’ जोडून विनयने तिच्याकडून शिक्षा स्विकारायची मानसिक तयारी केली.

“ठीक आहे नैना, पुढचे फटके तु देवू शकतेस. पण फटके नीट जोरात द्यावे लागतील, नाहीतर मी ते मोजणार नाही” सविताने नैनाकडे छडी देत म्हंटलं

“मी प्रयत्न करते” म्हणत नैना ने छडी उगारली आणि पहिला फटका दिला.

विनयच्या हातावर पहिला फटका पडला, पण तो खूपच सौम्य होता.

“शून्य” सविता ने तो ‘मोजला’

नैना ने पुन्हा प्रयत्न केला, यावेळी थोडा अधिक जोर होता. पण सविताचे समाधान झाले नाही.

“शून्य” ती पुन्हा म्हणाली.

असे अजून थोडे ‘शून्य’ झाल्यावर नैनाच्या फटक्यात पुर्ण जोर भरला गेला. आणि सविताचे आकडे पुढे वाढू लागलेत. विनय शांतपणे फटके झेलत होता.

शिक्षा संपल्यावर सविताने फर्मावले “सकाळी आठ वाजता लॉंड्री उघडते, सव्वा आठपर्यंत तु तो ड्रेस घेवून इथे आला पाहिजेस”

जेवण होवून विनय गेल्यावर नैना ने विषय छेडला

“सविता, तु म्हणत होतीस ते खरं आहे गं. खरच तो स्वत:ला समर्पित करतो.”

“आता तुला पटले तर आमच्यात काय केमिस्ट्री आहे ते”

“हं.. पण मला पटविण्यासाठी आपण त्याची शिक्षा मात्र वाढवली गं खूप”

“ठीक आहे ना. तुला पण छडीने फटके देण्याचा अनुभव घ्यायचा होता ना. कसा वाटला अनुभव ?”

“मस्त गं.. म्हणजे मी एका मुलाला ताड ताड फटके देत होते आणि तो मान खाली घालून ते खात होता.  मी कुणीतरी खूप सामर्थ्यवान आहे असं वाटलं.”

“हं.. बरोबर. नेमकी अशीच भावना असते ती. त्याला शिक्षा करताना मलाही त्याक्षणी माझ्याकडे खूप वेगळं सामर्थ्य आहे याची जाणीव होते. या सामर्थ्यापुढे तो शरण जातो, कोणताही विरोध तो करु शकत नाही. म्हणजे मानसिक पातळीवर त्याला ते शक्यच नसतं. मी त्याला जेव्हा बेल्टने मारत होते तेव्हा तर मी जणू काही एखादी राणी आहे आणि माझ्याकडे अनिर्बंध सत्ता आणि सामर्थ्य आहे असं मला वाटत होतं. त्या वेळचं त्याच समर्पण तर अप्रतिम होतं. जणू माझ्यासमोर आणि माझ्या चाबकाच्या फटक्यांपुढे समर्पित होण्यानेच त्याचा जन्म सार्थकी लागणार होता. त्याच्या पाठीवर उमटणारा एक एक वळ माझा उन्माद वाढवत होता. असं वाटत होतं की मी चाबकाने अगणित फटके देत रहावे, थांबूच नये आणि त्याने ते झेलत रहावे. त्या प्रसंगाने आमच्यात जे बंध निर्माण झाले त्यांमुळे पुढे अनेक वर्ष दूर राहुनही आमच्यातील भावनिक जवळीक कायम राहिली.”

“पण मला आता वाईट वाटतंय गं. माझ्या अनुभवाखातर आपण हे नाटक रचले आणि त्या बिचा-याला इतक्या वेदना दिल्यात.”

“अगं त्याचं तु वाईट वाटून नको घेवूस. वेदना तर होते, पण अशा प्रकारे स्वत:ला समर्पित करुन त्याला मानसिक आधार मिळतो. आणि सध्या नोकरीच्या चिंतेने त्याला व्यापून टाकलं होतं. अशा वेळी हा मानसिक आधार त्याच्याकरिता गरजेचाच आहे.”

“तरी पण गं. खूपच जास्त शिक्षा दिली आपण त्याला. मला अनुभव मिळावा म्हणून त्याला आणखी चाळिस फटके पडलेत”

“तु काही मिनिटंकरिता माझ्या भुमिकेत शिरलीस. काही क्षण तु त्या अनुभवाचा आनंद घेतलास, पण तुझ्या मनात त्याच्याबद्दल स्वामित्वाची किंवा त्याच्यावर अधिकार गाजविण्याची भावना नव्हती. त्यामुळे तुला आता वाईट वाटणं स्वाभाविक आहे. पण खरच त्याची गरज नाही कारण त्याचं समर्पण हे मला होतं, माझ्या ऐवजी, माझी प्रतिनिधी म्हणून त्याने ती शिक्षा तुझ्याकडून स्विकारली असली तरी त्या शिक्षेची पुर्ण जबाबदारी माझीच आहे. आणि मी हे जे काही करते ते आमच्या दोघांसाठी योग्य असतं म्हणूनच”

“तरीपण गं मला अपराधी वाटतंय. असं वाटतं की मी स्वत:ला फटके मारावेत त्याच छडीने”

“हो का ? मग तु कशाला त्रास करुन घेतेस मी असताना. कर हात पुढे, देते मी दहा फटके तुला” सविता हसून म्हणाली.

नैना ने हात पुढे केला. सविताने छडीचा जोरदार फटका दिला.

“आई गं..मेले मी..जरा हळू मार ना.” नैना कळवळून म्हणाली

“हात पुढे” सविताने फर्मावले तसा नैनाने हात पुन्हा पुढे केला.

अजून दोन फटके पडल्यावर मात्र नैना रडू लागली.

“बस, बस. आता नको मारुस. नाही खाऊ शकत मी हा मार”

सविता ने लगेच छडी बाजूला ठेवली.

“बापरे.. किती लागते ही गं ही छडी. विनय कसा सहन करत असेल देव जाणे” नैना अश्रू आवरत म्हणाली.

“अगं तेच तर मी सांगते आहे. समर्पणाची भावना त्याला ते बळ देते. आता तू विचार कर की तुझ्या मनात अपराधीपणाची भावना होती तरी पण तु हे फटके शिक्षा म्हणून देखील घेवू शकली नाहीस. कारण फक्त अपराधी पणाच्या भावनेने तुला ते बळ दिलं नाही. पण जर त्या अपराधीपणाच्या भावनेसोबत समर्पणाची भावना असेल तर बहुधा तु अशी शिक्षा सहन करु शकशील.”

“म्हणजे ? मला नाही कळालं”

“कल्पना कर एखाद्या अतिशय भावूक क्षणी, राहूल तुझ्यावर खूप नाराज असल्याने तु भावूक झाली आहेस आणि राहूलला तुझ्यावर राग काढायचा आहे, तुझ्यावर वर्चस्व गाजवायचं आहे, तुला शिक्षाही करायची आहे. कदाचित अशा वेळी त्याने हातात अशीच छडी घेतली तर…”

“तर कदाचित मी ती शिक्षा सहन करेन..कदाचित का, नक्कीच करेन, माझी सगळी सहनशक्ती पणाला लावून करेन. आमच्या प्रेमासाठी नक्कीच करेन” भावूक होत नैना ने उत्तर दिले.

“बरोबर..कळालं की तुला आता.” सविता हसून म्हणाली.

“अच्छा …म्हणून अनेकदा बायकांना नव-याचा मार बरा वाटत असावा का ? म्हणजे मी ऐकलय असं की काही वेळा बायकोला नव-याने रागावलं, आवाज चढवला किंवा मारलं की बरं वाटतं”

“हो. बायकांची समर्पणाची भावनिक गरज पुर्ण होते. पण दोघांच्या गरजा याउलट असेल तर थोडी विचित्र परिस्थिती होते. बायका सहसा नव-याला मारु शकत नाहीत किंवा ‘मला वर्चस्व गाजवायला आवडते’ हे स्वत:शी देखील कबूल करत नाहीत. पण वर्चस्व गाजवण्याची त्यांची गरज त्यांना स्वस्थ बसू देत नाही. त्या नव-यावर चिडचिड करतात, त्याला अपमानित करतात. आणि पुरुष त्यांच्या अहंकारामुळे स्वत:ची समर्पणाची भावना नाकारतात. मग भावनांचा नीट प्रकारे निचरा होत नाही. अशा नात्याची परिणीती त्रासदायक भांडणात होते”

“तू तर ग्रेट आहेस गं. तु या सगळ्यांचा इतका विचार केला आहेस..”

“आमच्या आगळ्या वेगळ्या नात्याचा नेमका अर्थ लावताना करावा लागला. आमच्या नात्याचं हे वेगळेपण, आमच्या या वेगळ्या गरजा नाकारण्यापेक्षा त्या नीट समजून त्याचा उपयोग आमचं नातं अधिक घट्ट करण्यासाठी करावं असं मला वाटलं. त्यामुळे मी विचार करत गेले. हळूहळू ते विचार स्पष्ट होत गेलेत.”

०—-०

दुस-या दिवशी सकाळी आठ वाजून दहा मिनटांनी विनय सविताचे इस्त्रीचे कपडे घेवून आला. त्या दिवसापासून सायंकाळी व्हॉलीबॉल खेळून तो नऊ च्या आधीच घरी येवू लागला.

तीन चार दिवसांनी रात्री झोपताना नैना म्हणाली

“तुझी मात्र तर एकदमच उपयोगी पडली गं”

“हो ना. त्या फटक्यांची वेदना फार तर एक दोन दिवस राहिली असेल. पण त्यांचा परिणाम दीर्घकाळ राहील. आहे ना एकदम परिणामकारक मात्रा”

नैना ने कौतुकाने मान हलविली

“ए ऐक ना. तुमच्या दोघांकरिता एक खास उखाणा सुचलाय मला. म्हणजे तु विनयचं नाव घेणार असेल उखाण्यात तर ..”

“ऐकव ना” सविताने उत्सुकता दाखविली

“ऐक.

कधी हातावर छडीचे फटके, कधी पाठीवर चाबकाचे वळ

वेड्यासारखा वागला विनय, तर फोडुन करेन सरळ”

दोघी हसू लागल्यात.

(प्रकरण समाप्त)

प्रकरण सहा

आज विनयचा वाढदिवस होता. सविता सकाळीच विनयकडे गेली. त्याला शुभेच्छा देवून ती म्हणाली “विनय संध्याकाळी घरी ये हं. मी पण लवकर येईन. आपण तुझा वाढदिवस साजरा करुयात”

“ठीक आहे.”

विनयने नोकरीकरिता काही मुलाखाती दिल्या होत्या. पण अजून कुठून सकारात्मक उत्तर आले नव्हते. पण निराशा न होता तो मोकळा वेळ अभ्यासात घालवत होता. तरी मनात सारखे नोकरीचे विचार घोळत असायचे.  दुपारी त्याला एका कंपनीतून फोन आला एका पदाकरिता त्याची निवड झाल्याचे त्यांनी कळविले, तसेच बाकी सगळ तपशील ईमेल ने पाठवला होता. विनय अतिशय आनंदात होता. मात्र सविताला सायंकाळीच ही आनंदाची बातमी सांगायची असे त्याने ठरवले.

सायंकाळी विनय सविताच्या घरी गेला, तेव्हा ती घरी आलेली होती आणि त्याचीच वाट पहात होती. तिने लाल रंगाची झुळझुळीत मिडी घातली होती. विनयने तो ड्रेस तिला काही महिन्यांपुर्वी भेट दिला होता. त्या ड्रेस मध्ये ती त्याला नेहमीपेक्षा खूप जास्त आकर्षक वाटायची.

सविताने केक आणून टेबलावर मांडला.

“चला विनयराव, केक कापा” नैना ने विनयला शुभेच्छा देत म्हंटले.

“अरे थांबा, अजून एक गंमत आहे” म्हणत सविता स्वयंपाकघरात गेली.

तिने फ्रीजमधून शॅम्पेन्ची बाटली आणली.

“वा… सही. आता आधी शॅम्पेन मग केक.” विनय आनंदाने चित्कारला.

सविता ने बाटली उघडून फेसाळणा-या शॅम्पेनचे तीन ग्लास भरले.

शॅम्पेन पिऊन झाल्यावर विनयने केक कापला. सविताने त्याला केक भरवला.

केक खावून झाल्यावर नैना बाहेर निघून गेली. सविताने म्युजिक सिस्टीम चालू केली.

“डान्स करुयात ?” विनयने विचारले.

दोघे नृत्याचा आनंद घेवू लागले. शॅम्पेनमुळे काहीशी नशा चढली होती. गाणी बदलत राहिली आणि दोघे खूप वेळ नृत्य करत राहिले. तिचा हात हातात घेवून नृत्य करतान तो उत्तेजित होत होता. ती ही एका वेगळ्या विश्वात रमली होती.

अखेर थकून सविता सोफ्यात बसली. विनय पण थकला होता. तो तिच्याजवळच जमिनीवर गुडघ्यांवर बसला.

काही क्षण तसेच गेले. तिने थकून डोळे मिटले आणि ती दीर्घ श्वास घेत होती. मिडी गुडघ्यापर्यंतच असल्याने तिचे गोरे पाय त्याला समोर दिसत होते. तिच्याबद्दलच्या आकर्षणाने तो बेधुंद झाला. पुढे होत त्याने तिच्या पायाला हलकेच स्पर्श केला. डॊळे न उघडताच ती सौम्य हसली. त्याने पुढे होत तिच्या पायांना मिठी मारली आणि तिच्या गुडघ्यावर डोके टेकवले, तिच्या पायाचे चुंबन घेतले.

त्याच्या या अनपेक्षित जवळिकीने ती सुखावली. डोळे उघडत ती त्याच्यापाशी झुकली, त्याच्या दंडांना धरुन तिने त्याला जवळ ओढले. दोघे एकमेकांच्या डोळ्यांत पाहू लागले. दोघांच्या डोळ्यांतून जणू आतुर प्रेमाचा झरा वाहत होता.

“आय लव यू” दोघेही एकदमच बोलले. आणि हसू लागले. ती उठून उभी राहिली. तिच्या कमरेला त्याने घट्ट मिठी मारली. तिच्या मिडीच्या झुळझुळीत स्पर्शाने तो उत्तेजित झाला होता. ती त्याच्या डोक्यातुन, गालावरुन हात फिरवित होती.

बराच वेळ तसाच निघून गेला. मग भानावर येत ती म्हणाली

“चल, आपल्याला बाहेर जेवायला जायचं आहे”

“हो. पण त्या आधी एक बातमी सांगायची आहे तुला. मला नोकरी मिळाली”

“वा…अभिनंदन..तुझा आजचा दिवस खूप काही मिळण्याचा आहे तर” ती गोड हसत म्हणाली.

“माझ्याकडे पण तुझ्यासाठी काहीतरी आहे” ती पुढे म्हणाली.

“काय ?” त्याने आश्चर्याने विचारले.

“खाली चल आता लवकर, मग कळेल”

दोघे बाहेर पडुन खाली आलेत. त्याची उत्कंठा शिगेला पोहोचली होती.

“सांग ना काय आहे ?”

तिने पर्स मधून गुलाबी कागदात गुंडाळलेली एक छोटाशी डबी त्याच्या समोर धरली.

त्याने उत्सुकतेने कागद काढून डबी उघडली. बाईकची चावी बघून तो खूप खूष झाला. तिने पार्किंग मध्ये त्याला बाईक दाखविली. मॉडेल , रंग सगळं काही त्याच्या आवडीचं होतं. हे सगळं तिला कसं कळलं हे कोडं मनात ठेवून त्याने विचारले

“चल आता आपण बाइक वरच जाऊयात”

“अरे शहाण्या माणसा, तु मद्यप्राशन केलं आहेस त्यामुळे तु बाईक चालवू शकत नाहीस. “

“काय गं, एवढंस त प्यालो आहे.”

“नको रे बाबा. ऐक माझं. मी चालवली असती बाईक पण मी पण घेतली ना दारु”

“हा हा. तुला चालवता येते बाईक ?”

“मग काय बाईक स्वत: चालून इथे आली का वेड्या ?” त्याला वेडावत ती म्हणाली.

“ए पण जावू ना बाईकवर ..”

“नाही म्हणजे नाही. मुकाट्याने रिक्षाने चल बरं” ती ठामपणे म्हणाली

“बरं मग या शनिवारी आपण फिरायला जावू बाईकवर”

“चालेल. कुठे जायच ?” तिनं विचारलं

क्षणभर विचार करीत तो म्हणाला “आती क्या खंडाला ?”

“होय माझ्या आमिर खान..”त्याच्या दंडाला घट्ट धरीत ती म्हणाली.

रेस्टॉरंट मध्ये दोघे एकमेकांच्या डोळ्यांत बघत बसले असताना तिने हलकेच म्हंटले

“माझ्यकडे अजूनही काही आहे तुझ्यासाठी..”

“काय ?”

“एक मस्त बातमी.. खूप खास.”

“काय ? सांग ना”

“आज नाही सांगणार. परवाच सांगेन आता खंडाळ्यात.” ती खट्याळपणे हसत म्हणाली

“ए असं ग काय करतेस, सांग ना प्लीज”

तिने हसत, मानेनच नकार दिला.

एक सुंदर, उत्कट सायंकाळ आता संपली होती. दोघे सोसायटीच्या पार्किंगमध्ये हातात हात घेवून उभे होते.

“जावूयात आता घरी ?” सविताने विचारले

“नाही”

“ए वेड्या..” तिच्या ओठांवर खट्याळ हसू पुन्हा पुन्हा फुलत होते.

त्याने जवळ येत तिला मिठीत घेतले. पुढच्या काही क्षणांत दोघांनी एकमेकांवर चुंबनांचा वर्षाव केला.

०—-०

ठरल्याप्रमाणे शनिवारी दोघे खंडाळ्याला निघाले. त्याच्या सांगण्यावरुन तिने त्याच्या आवडीची लाल मिडी घातली. तसंच तिच्या सुंदर गो-या पायांवर काळे चामडी बूट चढवले होते. त्यामुळे तिचे सौंदर्य अधिकच मादक बनले होते.

प्रवासात त्याने दोन तीनदा त्या बातमीबद्दल विचारले. पण तिने त्याची उत्सुकता ताणत ठेवली.

खंडाळ्याच्या निसर्गाचा थोडा वेळ आनंद घेवून ते एका रिसॉर्टमध्ये आले.

खोलीत आल्यावर त्याने पुन्हा विचारले

“सविता, आता तरी सांग ना, काय आहे ती खूप खास बातमी”

“अरे सांगेन ना, घाई काय ? आणि फुकटच सांगू होय ?” ती हसत म्हणाली.

“मग ? काय पाहिजे तुला ?”

“तू माझी सेवा कर आधी” त्याचा कान पिळत ती म्हणाली.

“अच्छा ? काय करु सांग”

“अं.. माझ्या पायातले बूट उतरवून बाजूला ठेव आधी” ती पलंगावर बसत म्हणाली

“ओके मॅम..” तो गुडघ्यावर बसला आणि तिचे बूट उतरवू लागला. ती त्याच्याकडे बघून हसत होती.

“हं आता काय करु ?”

“आता बाथरुम मधून पाणी आण बादलीत. माझे पाय धुवून दे”

तो न बोलता बाथरुम मध्ये गेला. बादलीतून पाणी आणून त्याने तिचे पाय धुतले आणि टॉवेलने हलकेच पुसले.

तिने पाय पलंगावर घेतले. तिने काही न सांगताच तो तिचे पाय चेपू लागला. तिचे पाय चेपताना तो अधिकच उत्तेजित झाला होता.  हलकेच तो तिच्या पायाची चुंबने घेवू लागला. तिने त्याला जवळ ओढले. चुंबनाच्या वर्षावात न्हाऊन निघत ते जवळ येत होते.

त्या बेधुंद प्रणयानंतर ते बराच वेळ पलंगावर पडून राहिलेत.

“भूक लागली रे मला..” थोड्या वेळाने ती म्हणाली.

“खाऊन टाक मला” तिच्या छातीवर डोकं टेकवून तो म्हणाला.

“तुला खाल्लं तर माझी सेवा कोण करणार” त्याचे नाक ओढत ती म्हणाली.

“हा हा…बरं तु अजून ती खास बातमी नाही सांगितलीस”

तसं ती त्याच्या डोळ्यांत बघत बोलू लागली

“नैना आणि राहूल पुढच्या महिन्यात लग्न करत आहेत”

“बरं मग ?”

“मग असं की.. ती अजून पंधरा दिवसांनी फ्लॅट सोडणार आहे…आणि..”

“आणि ?”

“आणि मगं माझ्या फ्लॅटमध्ये, माझ्याबरोबर, माझी एक प्रिय व्यक्ती असणार आहे…”

“वा…सही..” त्या बातमीने उत्तेजित होत विनयने पुन्हा एकदा तिच्या सर्वांगावर चुंबनांचा वर्षाव केला.

०——०

नैना ने फ्लॅट सोडल्यावर विनय सविताबरोबर राहण्यासाठी आला. तो नोकरीवर रुजू झाला होता. दोघे अतिशय आनंदात होते आणि सहजीवनाचा मनमुराद आनंद घेत होते.

हळूहळू त्यांचा दिनक्रम स्थिरावू लागला. आठवड्याचे पाच दिवस बरेच धकाधकीचे जात. आणि सुटीच्या दिवशी त्यांना निवांतपणा मिळत असे. नैना सोबत असताना ती आणि सविता घरातील कामे आपसांत वाटून घेत, पण विनयला घरातील कामांची फारशी माहिती अथवा सवय नव्हती. त्यामुळे सविताचा बराचसा वेळ आणि उर्जा कामे पुर्ण करण्यात जाऊ लागला आणि ती दमून जाऊ लागली.

एक दिवस तिने त्याच्याकडे विषय काढला

“विनय, नैना आणि मी दोघी मिळून घरातली कामे करत होतो. आता आपण दोघे रहातोय तर तु पण काही कामं कर. तुला या कामांची फारशी माहिती नसेल. म्हणून मी ती तुला हळूहळू शिकवेन. आणि तुला झेपतील इतकंच काम मी तुला देईन. मग त्या कामांची जबाबदारी तुझी असेल. अर्थात एखादं काम तुला नाहीच जमलं किंवा अजिबातच आवडलं नाही तर मी ते पुन्हा माझ्याकडे घेईन. पण तु निदान मनापसून प्रयत्न केला पाहिजेस”

विनयने ते मान्य केलं.

तिनं त्याला हळूहळू काही कामांची माहिती करुन देत ती शिकवायला सुरवात केली. विनय पण शिकण्यात उत्साह दाखवत होता. सविता प्रत्येक आठवड्यात त्याला एक किंवा दोन नवीन कामे समजवायची. प्रत्येक काम नीट समजून, शिकायला आणि सराव व्हायला त्याला पुरेसा वेळ मिळेल याची काळजी ती घेत होती.पण नवीन काम शिकल्यावर जुन्या कामचा त्याला विसर पडे. कधी तो एखादे काम करायचे विसरुन जाई तर कधी त्याच्या कामात काही त्रुटी रहात. अशा वेळी ती त्याला पुन्हा समजून सांगत असे तसेच यापुढे काळजी घेण्याबद्दल सांगत असे.

तिने त्याला आठवड्यातुन एकदा जास्तीत जास्त दोन पेग दारु पिण्यास परवानगी दिली होती. पण कधी कधी त्याला एकापेक्षा जास्त वेळा दारु पिण्याची इच्छा व्हायची. अशा वेळी तो कधी दारु घेतल्यानंतर तिची विनवणी करायचा किंवा घेण्याआधीच तिला परवानगी देण्याकरिता गळ घालायचा.

बरेचदा ती त्याच्या बेशिस्त आणि बेफिकीर वागण्याकडे दुर्लक्ष करायची, कधी प्रेमाने तर कधी सौम्यपणे रागावून समजवायची. तो यापुढे काळजी घेण्याचं आश्वासन देई. तिलाही मग त्याला जास्त रागावणं किंवा दुखावणं कठीण वाटे.

असेच काही महिने गेलेत. विनयचा बेफिकिर आणि बेशिस्तपणा वाढू लागला.

अखेर एका रविवारी तिने विषय काढला.

रविवार असल्याने तो उशीरा उठून टी.व्ही. बघत होता. ती काही कामं आटपत होती.

तिने बेडरुम मधून त्याला हाक मारली

“काय गं ? काय झालं ?” टी.व्ही समोरुन न हलताच त्याने विचारलं.

“तु इकडे ये”

“हं येतोच” म्हणत तो पुन्हा टी.व्ही. चे चॅनेल्स बदलू लागला.

तिने बाहेरच्या खोलीत येत सरळ टी.व्ही. बंद केला.

“तुला आत बोलवला ना मी ?” तिने नाराजीच्या सुरात विचारले.

“हो. येतच होतो. पण तु का रागावली आहेस ?”

“चल आत..” तिच्या आवाजात काहीशी जरब होती.

तो तिच्या पाठोपाठ गेला.

“ह सांग आता. काय झालं ? का रागावली आहेस ?”

“आजचा पुर्ण दिवस टी.व्ही. बघायचा नाहीस”

“का ? काय झालं”

“तुझा बेशिस्तपणा वाढतो आहे.  घरातली कामं नीट करत नाहीयेस. ड्रिंकचं प्रमाणही वाढलं आहे. आता मला सगळ्यांवर नियंत्रण ठेवावं लागेल आणि तुला शिस्तही लावावी लागेल”

तो काहीच बोलला नाही.

“आता आज काय काय कामं करायची ते तुला सांगते. सगळी कामं नीट व्हायला हवीत. आणि दोन आठवड्यांची मुदत देते तुला, दोन आठवड्यात तुझ्या सगळ्या कामांत, दिनक्रमात शिस्त आणि पुर्ण नियमितपणा यायला हवा. आणि मी हे पुन्हा सांगणार नाही.”

“सॉरी सविता. मी करतो सगळी कामं नीट”

त्या दिवशी विनयनं सगळी कामं चोखपणे केलीत आणि टी.व्ही. पण चालू केला नाही. पुढचे चार पाच दिवस तो नियमितपणे त्याला ठरवून दिलेली कामे करत होता. सविताने ही पुन्हा काही विषय वाढवला नाही. रविवारचा उरलेला दिवस आणि नंतरही ती हसत खेळत वागत होती. त्यांचा पुढचा रविवार मजेत गेला. विनयने त्याच्या रविवारच्या कामांतली निम्मीअधिक कामे केली होती. उरलेल्या कामांसाठी सविताही त्याला काही बोलली नाही.

पण पुढच्या आठवड्यात विनयच्या कामात पुन्हा अनियमितपणा येवू लागला. पण ती काहीच बोलली नाही, तिने जाणुनबुजून त्याकडे दुर्लक्ष केले. पुन्हा रविवार आला.

सकाळचे नऊ वाजले होते. विनय नुकताच उठून आवरत होता.

सविताने त्याला बोलावले.

“विनय,दोन आठवड्यापुर्वी आपले काय बोलणे झाले होते ते आठवतेय का तुला ?”

“हो . .आठवतंय ना”

“काय म्हणाले होते मी ?”

“मला कामं नीटपणे करायला सांगितली होतीस”

“मग गेले दोन आठवडे तु तुझी सगळी कामं नीटपणे केलीस असं तुला वाटतं का ?”

“हो.. केलीत की”

“अच्छा..” असं म्हणत तिने त्याच्या न झालेल्या किंवा अपु-या कामांचा पाढा वाचला.

“हं..थोडं काही काही राहून गेलं”

“थोडं ?” तिने खोचकपणे विचारलं

“तसं नाही, पण तु ही नंतर या कामांबद्दल काही बोलली नव्हतीस” तो नरमून म्हणाला.

“मी कशाला बोललं पाहिजे विनय ? तुला तुझी कामं माहित आहेत ना ? मी माझी कामं करते, ते मला कुणी सांगतं का ?”

“सॉरी. आता करेन सगळी कामं नीट.”

“नेहमीच मी सांगितल्यावर करणार का तु ? आणि मी नाही सांगितलं तर हळूहळू एक एक काम सोडून देणार”

तो गप्प राहिला.

“ते काही नाही. तुला अनेकदा समजावून पण तु पुन्हा तसंच वागतो आहेस. तेव्हा आता आज मलाच समजवायची पध्दत बदलावी लागेल”

तो प्रश्नार्थक चेह-याने तिच्याकडे पाहू लागला.

“आता आजपासून प्रत्येक रविवारी सकाळी नऊ  मी तुझ्याकडुन शिस्तीचा पाठ गिरवून घेईन.”

“म्हणजे?”  त्याने गोंधळून विचारले.

“रविवारी नऊ वाजता तुझा पनिशमेंट टाईम. वीस ऊठाबशा आणि छडीचे वीस फटके”

“सॉरी सविता, मी खरंच आता मन लावून सगळी कामं नीटपणे करेन”

“ती तर तुला करावीच लागतील. ती नाही केलीस तर त्याकरिता अजून शिक्षा मिळेल. प्रत्येक आठवड्यातलं बेशिस्त, अनियमित वागणं, दारु पिण्याच्या मर्यादेचं उल्लंघन मी लक्षात ठेवून त्यापुढे येणा-या रविवारी नऊ वाजता तुझी शिक्षा ठरवेन. बाकी सगळं वागणं ठीक असेल तर तुला आता सांगितली ती शिक्षा मिळेल. आपण ट्वेंटी-ट्वेंटी शिक्षा म्हणूयात त्याला.”

“म्हणजे ? आठवडाभर नीट काम केलं तरी शिक्षा मिळणार ?

“हो. येणारा आठवडा नीट काम करायचयं, बेशिस्त वागायचं नाहीये याची आठवण रहावी म्हणून हि शिक्षा.”

“अगं पण..”विनय पुढे काही विचारु लागला पण त्याचा कान पकडत तिने त्याला थांबवलं

“आता अधिक प्रश्न विचारु नकोस. आधी कान पकडून उभा रहा.”

त्याने कान पकडले.

“रविवारी नऊ वाजता बरोबर तु इथे येवून अशा प्रकारे कान पकडून उभ रहायचंस. मग मी येवून तुझी एकूण शिक्षा किती ते ठरवेन आणि तुला शिक्षा देईन. आता मी तुझी आजची शिक्षा किती ते ठरवते.”

तो मान खाली घालून उभा होता.

क्षणभर विचार करुन ती म्हणाली “आज चाळीस- चाळीस. म्हणजे चाळीस उठाबशा, छडीचे चाळीस फटके. चल आधी उठाबशा चालू कर”

“ओके मॅम.” सविता जेव्हा शिक्षा करते तेव्हा ती त्यावर पुर्ण ठाम असते हे त्याला माहित होते. कुठल्याही प्रकारे वाद किंवा निव्वळ विनवणी जरी केली तरीदेखील शिक्षा वाढू शकते हे त्याला माहित होते.

त्याने निमुटपणे उठाबशा काढायला सुरवात केली. चाळीस उठाबशा काढल्या.

“आता हात पुढे कर”

त्याने हात पुढे केला. छडीचे फटके सपासप पडू लागले. पाच मिनटांतच दोन्ही हातांवर मिळून चाळीस फटके पडलेत. हाताची लाही होवू लागली होती. पण सविता छडीचे फटके देत असताना तिच्याकडे बघायला त्याला खूप आवडायचे.

०——०

शिक्षेचा परिणाम लवकरच दिसू लागला. विनय त्याला ठरवून दिलेली कामं मनापासून करु लागला. अर्थात तरीही रविवारची शिक्षा चालूच होती. रविवारी सकाळी ठीक नऊ वाजता तो दिवाणखान्यात कान पकडून उभा रहायचा. सविता येवून त्याला त्या आठवड्यात कामात झालेल्या चुका, त्रुटी सांगायची. फारशा काही चुका नसेल तर फक्त ट्वेंटी- ट्वेंटी ची शिक्षा मिळायची. पण चुका झालेल्या असतील तर ट्वेंटी- ट्वेंटी सोबतच कधी अंगठे धरुन उभे रहाण्याची, कधी टी.व्ही. न बघण्याची किंवा अशाच काही शिक्षा मिळत.

पण काही आठवड्यांत तो त्याची कामे अगदी चोखपणे करु लागला. अर्थात तरीही सविताने ट्वेंटी- ट्वेंटी ची शिक्षा चालूच ठेवली. विनयनेही त्याबद्दल तक्रार केली नाही. पण हळूहळू त्याच्या चांगल्या कामावर खूष होवून ती त्याला ट्वेंटी- ट्वेंटी मध्येही थोडी सवलत देवू लागली.

एका रविवारी विनय सवा नऊ वाजले तरी शिक्षेसाठी येवून उभा राहिला नव्हता. वास्तविक पुर्ण आठवड्यात त्याने अगदी व्यवस्थित काम केले होते, त्यामुळे सविताकडून त्याला ट्वेंटी- ट्वेंटी मध्ये तीस ते पन्नास टक्के सूट अपेक्षित होती. सूट मिळणार या आनंदात तो वेळेचं भान विसरला.

“विनय, किती वाजले आहेत हे पाहिलंस का ? आणि या वेळी काय करायच आहे ते तु विसरलास का ?”

त्याने घड्याळाकडे पाहिले. त्याची चुक त्याच्या लक्षात आली.

“सॉरी.. मी विसरलॊ होतो” पटकन उठत त्याने कान पकडले.

“या विसरण्याची तुला वेगळी शिक्षा मिळेल..”

“सॉरी मॅम”

तिला एक-दोन दिवसांपुर्वी जुन्या सामानात टी.व्हीच्या काळ्या जाड केबलचा एक पाच-सहा फुट लांबीचा तुकडा मिळाला होता. ती तो घेवून आली.

“तुला आज आणि पुढचे तीन रविवार या वायरचे वीस फटके तुला मिळतील. तसंच या चार रविवारी तुला ट्वेंटी- ट्वेंटी मध्ये पण सूट मिळणार नाही”

“येस मॅम” केबलच्या त्या जाड तुकड्याकडे पाहून त्याच्या पोटात गोळा आला.

“वायरचे फटके खाण्यासाठी आता अंगठे धरुन उभा रहा”

तो अंगठे धरुन उभा राहिला तेव्हा तो उत्तेजित झाला होता. तिने वायरचे दोन्ही टोक हातात धरुन त्याच्या पाठीत सपकन फटका मारला. तो कळवळला. बेल्टचा मार खावून खूप वर्ष झाली होती. तिने त्याला सावरायला काही सेकंद अवधी दिला. त्यानंतर एका पाठोपाठ एक फटके ती सपासप मारत राहिली. पाठीवर दहा फटके मारुन झाल्यावर तिने त्याच्या पायांवर फटके मारायला सुरवात केली. त्या वायरचे फटके त्याच्या मांडीवर, पोटरीवर जोरात पडत होते. त्यानंतर नेहमीची ट्वेंटी- ट्वेंटी शिक्षा झाली.  दुपारी तिने त्याच्या पाठीवरचे वळ तपासले. पाठीवर तसेच पायांवर थोडेसे हलके वळ उमटले होते. त्यावर तिने मलम लावले. त्या दुख-या वळांवरुन तिचा हात नाजूकपणे फिरत असताना त्याला शांत शांत वाटत होते. तिने त्याला जवळ घेतले आणि दोघांनी उत्कट शृंगाराचा आनंद घेतला.

या शिक्षेमुळे तो अधिकच व्यवस्थितपणे वागू लागला. तसेच पुढच्या रविवारी शिक्षेसाठी तयार राहताना त्याने तिच्यासाठी छडी आणि वायर टेबलावर काढून ठेवले. व ठीक नऊ वाजता तो कान पकडुन उभा राहिला.

तिनेही मग ठरल्यापेक्षा एक आठवडा आधीच त्याची वाढीव शिक्षा रद्द केली. आणि ट्वेंटी- ट्वेंटी मध्ये सूट देण्यासही सुरवात केली.

०——०

रविवारची शिक्षेची पंधरा-वीस मिनिटे सोडल्यास ती एरवी त्याच्याशी अतिशय प्रेमाने वागत असे. त्याची काळजी घेत असे. दोघांत नेहमीच खूप हास्य-विनोद चालू राही. प्रणय आणि शृंगाराचा खेळ ही नेहमीच रंगत असे.  दोघेही त्या प्रेमविश्वात अत्यंत रमलेले आणि आनंदी होते.

एकदा एका सायंकाळी दोघे जेवायला रेस्टॉरंट मध्ये गेले. पण नेहमी सविताच्या डोळ्य़ांत हरवून जाणा-या विनयचे लक्ष आज सारखे विचलित होत होते. तिने बाजूला वळून पाहिले, बाजूच्या टेबलावर एक जोडपे होते त्यातली मुलगी फार सुंदर होती. तिने लाल रंगाची रेशमी साडी घातली होती.

“काय रे.. तु तिच्याकडेच बघतो आहेस ना सारखा ?” सविताने विचारले

विनय ओशाळून दुसरीकडे बघू लागला.

“अरे बघतोयंस तर हो तरी म्हण”

“हं…सॉरी”

“ती आहे खूप सुंदर हे मात्र नक्कि” सविता हसत म्हणाली

“माहित नाही. पण त्या सुंदर साडीत खूप आकर्षक दिसतेय.” विनय म्हणाला.

“असं होय.. पण बराच वेळ बघितलंस तु तिला. आता नको बघूस”

“सॉरी..”

“अरे. इट्स ओके, जेव आता” ती हसून म्हणाली.

दोघे जेवू लागले. पण थोड्या वेळाने तिच्या लक्षात आलं की विनयची नजर पुन्हा पुन्हा त्या मुलीकडे जाते आहे.

“विनय, आता मात्र मी रागवेन हं.”

“का गं ? काय झालं ?”

“एक तर कुणाकडे असं एकसारखं बघणं हेच मुळात चूक. आणि त्यातही तु दुस-या मुलीकडे एकसारखा बघतोय, ते पण मी समोर असताना..”

“सॉरी सॉरी… आता नाही बघणार” विनय गडबडून म्हणाला.

दोघे पुन्हा इतर गप्पा मारत जेवण करु लागले. पण विनयचे लक्ष बाजूच्या त्या टेबलापाशी जातच होते.आणि सविताने त्याला तिकडे बघताना पाहिले की तो पुन्हा नजर वळवत होता. जेवण आटोपुन बाहेत पडतानाही त्याने एकदा त्या टेबलाकडे वळून पाहिले. आता मात्र सविता वैतागली होती.

“बाईक ची चावी दे” बाहेर येताच ती त्याला म्हणाली.

“का गं. तुला चालवायची आहे बाईक ?” त्याने चावी देत विचारले.

“हो. आणि तुला पायी घरी यायचंय ?”

“काय ? पायी ? ते का आणि?”

“शिक्षा आहे तुझी… आणि कसली ते तुला माहित आहे चांगलंच..” बाईक स्टॅंडवरुन काढून ती बाईकवर बसली.

“अगं सॉरी गं.. किती रागवतेस ?”

“आणि बस, रिक्षा, टॅक्सी वगैरे काही करायचं नाही, कळलं का ? ” तिने बाईक चालू करुन वळवली.

“एक काम कर ना.. माझं पैशांच पाकीटपण घेऊन जा ना मग, म्हणजे मला बस, रिक्षा काही करताच येणार नाही ” तो वैतागून म्हणाला.

“त्याची गरज नाही माझा तुझ्यावर विश्वास आहे आणि त्याचा तसाही उपयाग पण नाही कारण मग तु कुणाला लिफ्ट मागशील. आणि हो मी कदाचित झोपून जाईन तु दार उघडून आत ये, बेल वाजवून माझी झोपमोड करु नकोस” तिने हसत बाईक दामटली.

“आलिया भोगासी” म्हणत सुमारे चार-पाच किलोमीटर अंतर चालत तो घरी आला. त्याच्याकडच्या चावीने दार उघडून आत आला तर त्याला आश्चर्याचा धक्का बसला. सविता एक सुंदर पिवळ्या रंगाची रेशमी साडी नेसली होती. तिचे लांब, सुंदर केस तिने मोकळे सोडले होते.

त्याच्याकडे पाहून ती गोड हसली.

“दमलास का बाळा ?” त्याला चिडवत ती म्हणाली.

“ए तू खूप खूप छान दिसते आहेस या साडीत” तिला मिठीत घेत तो म्हणाला.

बेडरुम मध्ये बेडवर पडल्यावर ती त्याच्या पायांशी बसून त्याचे पाय चेपू लागली.

“अगं, हे काय करतेस ?”त्याने आश्चर्याने विचारले.

“हे प्राणनाथ, परस्त्रीकडे आपण मोहाने पाहात होता. म्हणून मी आपणास शासन केले. पण आता माझ्या हृदयातील दयाबुध्दी जागी झाली आहे. आपण जी पदयात्रा केलीत त्याने आपले चरण दुखू लागले असतील म्हणून मी ते चेपून देत आहे”

“तु पण ग्रेट आहेस. . एरवी इतकी प्रेमाने वागतेस पण शिक्षा देताना खूपच कठोर असतेस.”

“नाथ आता आपण जास्त बोलू नये. नाहीतर आपला कंठ दुखू लागेल, आणि मग मला तो दाबावा लागेल” तिच्या या विनोदावर दोघे हसू लागले.

थोडा वेळ ती त्याचे पाय चेपत राहिली. त्यानंतर दोघे शृंगाररसाने तृप्त झाले.

(प्रकरण समाप्त)
(प्रिय वाचक, कथेच्या नंतर काही polls आहेत, त्यात आपली मते (votes) अवश्य नोंदवा )


प्रकरण सात

“पल्लवी ..” विनय त्याच्या कंपनीच्या ऑफिसकडे चालला असताना त्याला त्याची बी.एस्सी. तली वर्गमैत्रिण दिसली आणि त्याने तिला हाक मारली.

“अरे विनय..”त्याला पाहून तिलाही खूप आनंद झाला. बी.एस्सी नंतर अनिकेत आणि पल्लवीनी लग्न केले. पुढे न शिकता दोघेही मिळेल ती नोकरी करत गेले. त्यानंतर विनयच्या त्या दोघांशी भेटीगाठी खूप कमी झाल्या होत्या.

दोघे कॉफीशॉप मध्ये गेले.

विनयने तिची, अनिकेतची आणि त्यांच्या संसाराची विचारपूस केली. ती तिच्या संसारात खूप आनंदी होती.

“ए तुझं काय रे ? तुला भेटली की नाही कुणी” पल्लवी नी विनयला विचारले.

“हं..” विनय संकोचून हसला

“अरे. लाजतोस काय ? कोण आहे ? कुठे असते ?”

“सविता नाव आहे तिचं. मी आता तिच्यासोबतच रहातो”

“ओह.. म्हणजे लिव्ह-इन-रिलेशनशिप तर. छान…पण भेटली कुठे तुला”

“नाशिकमध्येच. आम्ही शेजारीच रहायचो…”

“अरे मला वाटतयं की तु पुर्वी सांगितलं आहेस मला तिच्याबद्दल. तु दहावीत ट्युशन्स ला जायचास तिच्याकडे तिच का ?”

“हो..”

“पण ती तर तुझ्यापेक्षा बरीच मोठी आहे ना रे”

“हो. पाच वर्षांनी मोठी”

“हं…थोडं वेगळं वाटत नाही का रे पण हे. वयात असा फरक ?”

विनयने काहीच न बोलता खांदे उडवले

“काय आता सचिनचा फॅन तु, मग तुला ते नॉर्मलच म्हणा”

यावर दोघेही हसले.

“पण टुशन च्या मॅडमची गर्लफ्रेंड कशी काय झाली ? ते पण इतक्या वर्षांनी ?”

“मी बी.एस्सी. च्या पहिल्या वर्षाला असताना ती मुंबईला आली नोकरीसाठी. पण आम्ही नेहमीच संपर्कात होतो.”

“हं….ए ट्युशन्स घेताना तिने तुला शिक्षा पण केली होती ना रे… मला आठवतंय तु म्हणाला होतास एकदा”

“हो. ती शिक्षा करायची मला”

“हा हा… छडीने फटके देणारी ट्युशनची मॅडम आता गर्लफ्रेंड झाली… काही खरं नाही रे तुझं. मग आतापण असते का छडी” तिने थट्टेने विचारले

“कधी कधी” त्याने खालच्या पट्टीत म्हंटले.

“काय ?खरंच ?” तिने आ वासून विचारले

“हो. म्हणजे दर रविवारी”

“काय सांगतोस ?” तिला वाटले की विनय थट्टेनंच बोलत आहे.

“खरंच की. म्हणजे रविवारी ती मला आठवड्याभरातल्या चुकांसाठी शिक्षा करते. वीस उठाबशा आणि छडीने वीस फटके, किंवा मग जास्त किंवा कधी थोडी सूट मिळाली तर थोडी कमी”

तिचा विश्वासच बसेना. तेव्हा विनयने तिला सगळे काही नीट सांगितले, तसंच बी. एस्सी ला मिळालेले बेल्टचे फटके वगैरे, सगळं तिला सांगितलं.

“अरे, तु मुर्ख आहेस की काय ? ती तुझ्यावर सत्ता गाजवते, तुला गुलामाची वागणूक देते, आणि तु तिला गर्लफ्रेंड मानतोस. अरे तु खरचं वेडाबिडा आहेस का ?. आणि ती तरी अशी कशी मुलगी आहे. मुलगी आहे की कोण..इतकी क्रुर”

“अगं, पण तु असं का म्हणतेस. तिचं माझ्यावर खूप प्रेम आहे..”

“प्रेम ? मूर्ख झाला आहेस तू. गुलाम बनून राहिला आहेस तिचा. प्रेमाचा अर्थ तरी माहिती आहे का तुझ्या त्या मॅडमला. बेल्टने फोडून काढण्याला प्रेम म्हणतात का? तु तिचा गुलाम आहेस आणि गुलामाचा शारिरिक छळ करुन विकृत आनंद घेते आहे ती” पल्लवीचा राग अनावर झाला होता.

तो काहीच बोलला नाही.

“अरे पण ती कशी आहे, आणि किती विकृत आहे त्यापेक्षा तु कसा तिला बळी पडलास हेच मला कळत नाही. तुला काहीच विचित्र वाटत नाही का यात ?”

“काय चूक आणि काय बरोबर मला माहित नाही. पण मला नेहमीच तिचा आधार वाटत आला. प्रेमाचा खोलवर अर्थ कळत नव्हता तेव्हाही ती जवळची वाटायची. दहावीत असताना तिच्याकडून पहिली थप्पड पडली तेव्हा, हातावर छडीचे फटके मिळाले तेव्हा त्यात मला काही खटकलं नाही, तिचा राग पण कधी आला नाही, फक्त माझ्या चुकीमुळे मी तिच्या शिक्षेस पात्र ठरलो याचं वाईट वाटायचं. मी चोरुन सिगरेट ओढली तेव्हा तिने मला बेल्टने फोडून काढले. पण तेव्हाही मला तिचा राग आला नाही, उलट माझ्या चुकीची तिने योग्या आणि पुरेपुर शिक्षा दिली आणि मी पण ती न रडता ओरडता घेवू शकलो याचं समाधानंच वाटलं”

“अरे, ट्युशन टीचर म्हणून थोडीशी शिक्षा केली हे पण मी एक वेळ समजू शकते. पण त्यानंतर ? आणि ते पण इतक्या जहाल शिक्षा ?बेल्ट काय,छडी काय. आणि काय तर शिक्षा म्हणे..मला तर कल्पनाही करवत नाही. एक इतका चांगला आणि हुशार मुलगा तू, आणि तू असा या विकृतीच्या आहारी गेलास..” पल्लवीचा उद्वेग कमी होत नव्हता.

“मला कळत नाहीये पल्लवी, तुला इतकं का खटकतंय हे”

“कारण मी एक नॉर्मल, आपल्या नव-यावर प्रेम करणारी आणि त्याचा आदर करणारी एक मुलगी आहे. आणि कोणत्याही नॉर्मल व्यक्तीला हे खटकेलच”

“पण तु ही एकदा अनिकेत ला शिक्षा केली होतीस, सगळ्यांसमोर…”

“मी ? कधी ?” तिने आश्चर्याने विचारले

“एकदा तुझ्या बर्थडे ला तो उशीरा आला. तु त्याला रेस्टॉरंटमध्ये चाळिस उठाबशा काढायला लावल्या होत्यास”

“अरे देवा… तु ती गोष्ट अजून लक्षात ठेवलीस का.. आणि त्यामुळे मी त्याला नेहमीच गुलामासारखे वागवते असा अर्थ ही तु काढलास का? अरे मुर्खा ती एका प्रियकर आणि प्रेयसीमधली एक छोटीशी गंमत होती. खरंतर शिक्षा नाहीच, रुसव्या फुगव्याचा एक प्रकार फक्त. चार आठ दिवसातच मी, तो आणि बाकीचे सगळे मित्र मैत्रिणीही तो प्रसंग विसरुन गेलो”

“म्हणजे त्यानंतर तु त्याला कधीच पुन्हा तशी शिक्षा केली नाहीस ?”

“अरे काय झालंय तुला ? एक छोटीशी गंमत होती ती. तिचा काय अर्थ काढून ठेवलास.. मी त्याला शिक्षा करत असेन, त्याच्यावर वर्चस्व गाजवत असेन असं वाटतय का तुला ?  मी तर कल्पनाही नाही करु शकत आता असल्या गोष्टीची. आणि तु बरी तेवढीच गोष्ट लक्षात ठेवलीस. तो चार दिवस कॉलेजला नाही आला तर त्याच्या वहीत मी नोट्स उतरवून द्यायचे रात्री जागून. तो होस्टेलवर रहात होता, बाहेरचं खाउन कंटाळायचा तर रोज त्याच्याकरिता डबा बनवून आणायचे, हे काय माहीत नाही तुला? आणि तो कधी रागावून, चिडून बोलला अगदी मित्रांदेखतसुध्दा तरी मी त्याला चिडून प्रत्युत्तर करत नसे. हे सगळं तु विसरलांस आणि नको ते लक्षात ठेवलंस”

“सॉरी..”

“अरे मला सॉरी म्हणण्यापेक्षा तु यावर विचार कर. यातून बाहेर पड. एक मोठा शास्त्रज्ञ होण्याची कुवत आहे तुझ्यात आणि तु मात्र स्वत:च्या आयुष्याची माती करुन घेतो आहेस. तु जिला गर्लफ्रेंड म्हणतो आहेस ती तुला गुलाम समजते, स्वत:च्या विकृत सुखासाठी तुला वापरतेय. ज्या दिवशी तु तिची गुलामी करायचं नाकरशील त्या दिवशी ती तुला बाहेरचा रस्ता दाखवेल. आणि तुला वाटतंय की हे प्रेम आहे. विनय, अरे माझा चांगला मित्र आहेस रे तु म्ह्णून खूप वाईट वाटतयं रे तुला असं बघून.”

आणि बराच वेळ ती त्याला समजावत राहिली. विनय पुर्णपणे गोंधळून गेला होता.

०———–०

रविवारचा दिवस उजाडला. सकाळी साडे आठच्या सुमारास विनय त्याच्या बुटांना पॉलीश लावून चमकवत बसला होता. सविता गाणं गुणगुणत तिथे आली.

“ए तु मस्त चमकवतोस रे बूट. माझ्या बुटांना पण लाव ना पॉलीश.”

त्याने मान वर करुन तिच्याकडे पाहिले.

“तिकडे आहेत बघ, त्या कपाटात माझे बूट” असं म्हणत ती निघून गेली.

त्याने स्वत:चे बूट पॉलीश केले आणि तो तसाच बसून राहिला. थोड्या वेळाने सविता पुन्हा तिथे आली.

“काय रे काय झालं ? माझे बूट सापडले नाहीत की का? थांब मी देते काढून” असं म्हणत तिनं बाजूच्या कपाटातून तिचे बूट काढून त्याच्यापुढे ठेवले.

“मस्त चमकले पाहिजेत. बरं का ?” ती त्याला म्हणाली

तो काहीच बोलला नाही.जणू त्याचे तिच्या बोलण्याकडे लक्षच नव्हते. तिला आश्चर्य वाटले.

आत थोडं काम आटोपून ती दिवाणखान्यात आली. नऊ वाजले होते. विनय अजून तसाच बसला होता. तिच्या बूटांना त्याने हातही लावला नव्हता.

“काय रे ? काय झालं ? अजून बूटांना पॉलीश पण नाही लावलंस.”

तो काहीच बोलला नाही.

“बरं आता ते नंतर कर. नऊ वाजत आहेत. आत ये लवकर. उशीर झाला तर उगाच वायरचे फटके पडतील ना” ती हसून म्हणाली.

काही न बोलता तो उठून दिवाणखान्यात नेहमीच्या जागेवर आला.

पाठोपाठ सविता पण आली. ड्रॉवर मधून तिने छडी काढली.

त्याच्याकडे पाहत ती म्हणाली

“काय रे, काय झालंय आज ? अजून कान पकडून उभा नाहीस. छडी, वायर टेबलवर काढून ठेवली नाहीस. शिस्त विसरतोयस वाटतं. आठवण रहाण्यासाठी काहीतरी कराव लागेल का मला ?”

तो अजूनही काही बोलला नाही.

“बरं चल. या आठवड्याची शिक्षा. बुधवारपर्यंत तू सगळी कामं एकदम व्यवस्थित केलीस, एकदम शहाण्यासारखा वागलास. पण गुरुवार पासून थोडं दुर्लक्ष करत आहेस. आणि कसलं टेन्शन आहे का विचारलं तर नीट उत्तर पण देत नाहीस. बाकी पण नीट बोलत नाहीयेस. शुक्रवारी सकाळी पिण्याचं पाणी भरलं नव्हतंस. त्यामुळे आज ट्वेंटी-ट्वेंटी मध्ये सूट मिळणार नाही. खरंतर मी आज थोडी अजून शिक्षा देणार होते. पण मला वाटतंय तुझं काहीतरी बिनसलंय. आणि काय बिनसलंय ते मात्र आज तू मला सांगितलंच पाहिजेस”

तो अजूनही काही बोलला नाही. तसंच त्याने अजूनही कान पकडले नव्हते.

“बरं वीस ऊठाबशा काढ पटकन. मग मी वीस फटके देते” त्याच्या समोर छडी नाचवर ती म्हणाली.

“सॉरी सविता. मी शिक्षा नाही घेणार” गंभीर चेह-याने तो म्हणाला.

“का रे, काय झालं ? तब्येत बरी नाहीये का ? तसं असेल तर मीच तुला शिक्षा देणार नाही” तिने त्याच्या कपाळाला हात लावून बघितला.

“नाही असं काही नाही” तो म्हणाला.

“अरे मग ? काय झालं ? टेन्शन आहे का तुला कसलं ? ऑफिसमध्ये काही गडबड ?”

“नाही. असं काही नाहीये?”

“मग तुझा मूड का खराब आहे ?”

तो काहीच बोलला नाही.

“हे बघ तू काही बोलला नाहीस तर शिक्षा वाढेल हं. आणि हे तुला पण चांगलंच माहितीये. पण काही अडचण असेल तर स्पष्ट सांग”

“मला तुझ्याकडून शिक्षा घ्यायचीच नाहीये”

“वेड लागलंय का तुला ? काय बोलतोयस समजतंय का तुला ?”

“हो. मला तुझा गुलाम बनून नाही रहायचंय” मान वर करुन तिच्याकडे पहात तो म्हणाला.

हे ऐकून तिने त्याला कानाखाली मारण्यासाठी हात उचलला पण पुन्हा खाली घेतला.

“तू गुलाम नाहीयेस माझा. कधीच नव्हतास, आणि असणारही नाहीस. मी तसं कधीच समजले नाही”

“मग एका गुलामाला मिळावी तशी वागणूक, तशा शिक्षा मला का देतेस तु ?”

“याचं उत्तर मी देणार नाही. ते तुलाही चांगलच माहितीये, आणि मलाही” छडी बाजूला ठेवत ती म्हणाली.

काही क्षण दोघे गप्प होते.

“हे सगळं तुझ्या डोक्यात अचानक कुठून आणि कसं आलं? कुणामुळे आलं” तिनं विचारलं.

“कुणामुळे कशाला यायला हवं? मी विचार करु शकत नाही का ? तो काहीसा रागावून बोलत होता.

“बरं आता तुझं नेमकं काय म्हणणं आहे”

“मला तुझा आज्ञाधारक गुलाम बनून रहायचं नाही. तुझ्याकडून शिस्त शिकायची नाही आणि शिक्षाही घ्यायच्या नाहीत”

“तू चुकतोयस विनय. पण ठीक आहे. तुझी अशीच इच्छा असेल तर मी काही म्हणणार नाही”

विनयने बाईकची चावी तिच्यासमोर धरली.

“हे काय आता ?” तिने गोंधळून विचारले.

“तू आता मला तुझ्या फ्लॅट्मधून जायला सांगशील हे मला माहित आहे, मी लवकरच माझी व्यवस्था करतो. बाईकची चावी तू आताच घेवू शकतेस.”

“तुला असं का वाटलं की मी तुला जायला सांगेन ?” तिचे डोळे पाणावले होते.

“कारण आता मी तुझा गुलाम नाही”

“विनय, पुन्हा एकदा सांगते, तु माझा गुलाम कधीच नव्हतास. आणि मला तु माझ्या आयुष्यात नेहमीच हवा आहेस.”

तो काहीच बोलला नाही.

“मी तुझ्यावर खूप प्रेम करते रे. हे खरं की मी तुझ्यावर वर्चस्व गाजवते. आणि तुझ्यावर माझं प्रेम आहे म्हणूनच मला तुझ्यावर वर्चस्व गाजवावसं वाटतं. पण तुला ते नसेल आवडंत तर तु तुला हवं तसं राहू शकतोस. अर्थात तुझं माझ्यावर प्रेम नसेल तर मात्र मी तुला तुझ्या मनाविरुध्द थांबवणार नाही. पण निदान माझ्या प्रेमाबद्दल तरी शंका घेवू नकोस”

ती आता घराबाहेर जायलाच सांगेल अशी त्याला खात्री होती म्हणुन तिचं उत्तर त्याला अनपेक्षित होतं. तो तिला कदाचित प्रथमच रडताना पहात होता.

“सविता, माझं ही तुझ्यावर प्रेम आहे.”

“मग प्लीज मला सोडून जायचं बोलू नकोस” त्याचा हात हातात घेत ती म्हणाली.

“सॉरी सविता. नाही जाणार मी तुला सोडून” तो ओशाळून म्हणाला.

नंतर बराच वेळ कुणीच काही बोललं नाही. सविता उठून तिच्या कामाला लागली. नेहमीप्रमाणेच विनयच्या आवडीचा सगळा स्वयंपाक तिने बनविला.

पण दोघांत काहीसा अबोला पसरला होता.

०———–०

सविताने लवकरच अबोला संपविण्याचा प्रयत्न चालू केला. जणू काही झालेच नाही अशा रितीने ती वागू लागली. पण विनय मनावर काहीसे ओझे असल्याप्रमाणे वागत होता.

सविताने त्याला कोणतही काम सांगणं थांबवलं. सकाळी लवकर उठून ती विनयच्या वाट्याची कामं करुन मग स्वत:ची ही कामं करु लागली. सवयीने तो एखादं दोन कामे करीत होता. पण बरीचशी कामे तिने आधीच केलेली असायची. तो काहीसा अबोल रहात असे. पण ती प्रसन्न चेह-याने वागत असे. तिने त्याला त्याच्या मनातील गोंधळातून सावरण्यासाठी वेळ द्यायचे ठरवले.

दिवसामागून दिवस जात होते. विनयचे घरातले लक्ष कमी झाले. चेह-यावरची प्रसन्नताही उडून गेली होती. सायंकाळी ऑफिसमधून कधी लवकर घरी आला तर तो व्हॉलीबॉल खेळायला जात असे. खेळून यायला कितीही उशीर झाला तरी सविता आता त्याला काहीच बोलत नव्हती. पण त्याच्याकरिता ती नेहमीच जेवायला थांबायची. इतर वेळी तो घरात टी.व्ही. बघत राही.  कधी टी. व्ही. बघत दारुही पीत असे. त्याचे दारुचे प्रमाण वाढले होते. पण ती त्याला त्याबद्दल काहीच बोलली नाही. पण त्याला असं काहीसं निराश पाहून तिला वाईट वाटतं होतं. प्रणय आणि शृंगारातही तो रमेनासा झाला.

“विनय असं का करतो आहेस तु ? काय झालंय तुला ? आता सगळं तुझ्या मनासारखं होतंय ना मग का असा उदास असतोस ? की मी आवडत नाहीये तुला”

“असं काही नाहीये सविता”

“तसं असेल तर तसं सांग. मी तुला जबरदस्तीने थांबवणार नाही. मला थोडे दिवस वाईट वाटेल. पण आता मी तुला असा उदास नाही पाहू शकत”

पण तिच्या प्रश्नाचे उत्तर त्याच्याकडे नव्हते. ती त्याला नक्कीच आवडत होती. तिच्याशिवाय त्याने कधीच दुस-या मुलीचा विचारही केला नव्हता.

पण आता नेमकं काय होत आहे हे त्यालाही समजत नव्हते. पल्लवीशी झालेल्या भेटीनंतर त्याने खूप विचार केला तेव्हा त्यालाही वाटू लागलं होतं की सविताने त्याला गुलाम बनवून ठेवलं आहे. मग त्या गुलामगिरीतून बाहेर पडायचं त्याने ठरवलं.  सविताशी यावर बोलणं थोडं कठीण वाटत होतं. ती नक्कीच घरातून निघून जायला सांगेल, कदाचित आक्रमक होवून ती अधिकच सक्तीने शिक्षा करेल, बेल्टने फोडून काढेल पण गुलामगिरीतून बाहेर पडताना एवढं सहन करायची मनसिक तयारी त्याने केली होती. पण जे घडलं ते फार वेगळं होतं. “तू माझा गुलाम नक्कीच नाहीस” हे सविता फक्त बोललीच नाही तर ती ते रोजच सिध्द करत होती. आता ती त्याच्यावर अजिबात वर्चस्व गाजवत नव्हती. त्यांच्या नात्यातला हा बदल तिने आनंदाने स्वीकारला होता. “मला हा बदल का स्वीकारता येत नाहीये” तो स्वत:शी विचार करत होता. “मला नेमके हेच हवे होते का ?”

एकदा सुटीच्या दिवशी तो त्याचे कपाटातले सामान लावत होता. त्यावेळी त्याला त्याचा जुना बेल्ट सापडला. याच बेल्टने सविताने त्याला फोडून काढले होते. तो स्वत:शी विचार करु लागला “मी हा बेल्ट का जपून ठेवला आहे अजून? मुंबईला येताना तो सोबत का आणला ? आता फेकून देवू का ? का त्या आठवणी माझ्या मनात अजूनही रेंगाळत असतात. सविताने मला बेल्टने फोडून काढले तरी मला तिचा अजिबात राग का नव्हता आला. उलट पुढचे काही दिवस पाठीवरचे वळ बघून मला समाधान का वाटायचे. ते क्षण कधी संपूच नये असा विचार माझ्या मनात अनेकदा का आला? माझ्या प्रिय सविता मॅम ने दिलेले फटके मी पाठीवर झेलू शकलो यात मला माझा पुरुषार्थ का वाटला ? आणि आताही दर रविवारी शिक्षा मिळत असूनही मी आनंदी कसा असायचॊ ? सविता ने केबल-वायरने फटके दिलेत तेव्हा पुन्हा माझ्या जुन्या आठवणी जाग्या झाल्यात ते का? आणि आता सगळ्या शिक्षा बंद झाल्यात, सगळी शिस्त, कामाची जबाबदारी, कोणताही धाक नाही तरी मी समाधानी का नाही ?” त्याला प्रश्नांची उत्तरं मिळत नव्हती. पण तो बेल्ट काही तो फेकू शकला नाही.

०———–०

जे होत होतं त्याने सविता खूष नव्हती. पण तरीही ती आनंदी रहायची. विनय पुन्हा लवकरच चांगला आनंदाने राहू लागेल अशी तिला आशा वाटत होती. पण दिवस जात होते. विनयच्या मनस्थितीत फारसा बदल नव्हता.

एका शनिवारी सायंकाळी विनय व्हॉलीबॉल खेळायला गेला होता. सविताला बाहेर काही काम होतं म्हणून ती बाहेर पडली. ती चालत असताना रस्त्यापासून जवळच तिला कसलासा गोंधळ ऐकू आला. तो घोळका म्हणजे विनयचा व्हॉलीबॉलचा ग्रुप होता हे तिच्या लक्षात आले. ओरडण्याचे आवाज ऐकू येत होते. कुतुहलामुळे ती तिथेच थांबली. त्यातला एक आवाज विनयचा आहे हे लक्षात येवून ती घाबरुन त्या घोळक्याजवळ गेली. विनयचं कुणाशी तरी भांडण चाललं होतं. दोघेही हमरीतुमरीवर आले होते.

त्या घोळक्यात तिचा मित्र सचिनही होता. तिने सचिनला बाजूला घेत विचारलं

“सचिन काय झालं ? कशामुळे भांडत आहेत ते दोघे”

“सॉरी सविता. पण विनयची चूक आहे. गेले काही दिवस त्याचं खेळताना नीट लक्ष नसतं. आज पण खेळताना त्याच्याकडून चुका होत होत्या. तर योगेश त्याला म्हणाला की जरा लक्ष देवून खेळ. त्यावरुन त्याला राग आला. तो चिडून बोलला. मग योगेशचं पण डोकं फिरलं. आता दोघेही ऐकत नाहीयेत.”

“हं.. विनय सध्या जरा टेन्शन मध्ये आहे, ऑफिसचं काही टेन्शन रे. तु त्याला बोलवतोस का प्लीज ? नंतर तो येईल पुन्हा तुमच्यात एक-दोन दिवसाने. योगेशाला पण सॉरी म्हणेल तो…”

“हो.. एक मिनीट हं”

विनयचे सविताकडे लक्ष नव्हते. सचिन त्याच्या जवळ गेला. आणि त्याला बोलावून आणले.

“विनय का उगाच भांडणं करतो आहेस?घरी चल”

“मी काही उगाच भांडण नाही करत, त्यानेच सुरवात केली”

“मला आता काही ऐकायचं नाही. तु घरी चल लगेच” असं म्हणत ती घराकडे चालू लागली. काही क्षण थांबून तो ही तिच्यापाठोपाठ चालू लागला.

“काय होतंय विनय तुला ? का इतका अस्वस्थ असतोस तु सध्या?” घरी आल्यावर तिने त्याच्या डोक्यावरुन हार फिरवत त्याला विचारले.

“माहीत नाही” त्याने त्रोटक उत्तर दिले.

“ऑफिसचं काही टेन्शन आहे का ?”

“नाही”

“मग माझ्यावर रागावला आहेस का अजून”

तो काहीच बोलला नाही.

“ए वेड्या, असं किती दिवस वागशील. तु असा उदास आणि अस्वस्थ राहिलास तर मी तरी कशी आनंदी राहीन?” त्याला जवळ घेत ती म्हणाली.

“मला काही समजत नाहीये,मलाच कळत नाहीये मला काय वाटतंयं आणि मला काय हवयं ते” तिला कवटाळून तो रडू लागला.

“पण मला माहितीये..तुला काय हवंय आणि आपल्या दोघांसाठी ही काय चांगलं आहे ते”

“काय?”

“आपल्या नात्याचं वेगळेपण जे तु नाकारत आहेस ते. ज्याला तु माझी गुलामी समजू लागलास ते तुझं समर्पण होतं. स्वत:ला समर्पित करुन तुला मानसिक समाधान आणि आधार मिळत होता. आता तो आधार नाकारुन तु गेले दोन महिने तू फक्त अस्वस्थ आहेस. आपण खूप पुर्वीपासून एकमेकांच्या जवळ होतो. पण आपल्या प्रेमातलं हे वेगळेपण म्हणजे आपल्या प्रेमातली अट नाहीये, कधीच नव्हती. पण त्या वेगळेपणाने आपल्यात खूप अनोखे बंध निर्माण केलेत. जे फक्त आपणचं अनुभवू शकतो.”

तिचं बोलणं ऐकून त्याच्या भावनांचा बांध फुटला. जमिनीवर गुडघे टेकून त्याने तिच्या पायांना मिठी मारली.

“हो सविता. खरंय तुझं म्हणणं. प्लीज माझ्यावर अधिकार गाजव, मला मार, मला शिक्षा कर. मी चुकलो. मला शिक्षा दे. दोन महिन्यात मी तुझ्याशी खूप चुकीचं वागलो. तुझ्याकडे नीट लक्षही दिलं नाही. तु जवळ असूनही तुझ्या प्रेमापासून स्वत:ला दूर ठेवलं. मी भरकटलॊ होतो. मला माफ कर.”

तिने त्याच्या डोक्यातून हात फिरवित त्याला शांत करत होती.

दुस-या दिवशी म्हणजे रविवारी विनय सकाळी लवकर उठला. रविवारसाठी त्याला ठरवून दिलेली कामे त्याने पटापट उरकली. तसंच सविताचे बूट कपाटातून काढून त्यांना पॉलीश लावून चमकवले. आणि नऊ वाजता तो दिवाणखान्यात आला. टेबलावर छडी आणि वायरचा तुकडा काढून ठेवला आणि नेहमीच्या ठिकाणी कान पकडून उभा राहिला. थोड्याच वेळात सविता तिथे आली

“छान..” त्याच्याकडे पाहून ती हसत म्हणाली.

“प्लीज मला शिक्षा कर. माझी दोन महिन्यांची शिक्षा बाकी आहे. ती मला दे”

“हं.. अच्छा ? पण आज मी हे काही वापरणार नाही” छडी आणि वायर बाजूला सारत ती म्हणाली.

“का ?मला माफ नाही केलंस का अजून ? मला गरज आहे गं या शिक्षेची. तुझ्या पायांशी मला समर्पित करायची”

“मलाही हवं आहे तुझं समर्पण. आणि शिक्षा तर मी करणार आहेच. पण दोन महिन्यांनतर आज आपल्या भावनांचा अविष्कार थोडा तीव्र असणार आहे. तो छडीने, वायरने किंवा उठाबशा काढून पुर्ण नाही होवू शकत”

“मग ?”

“एक मिनीट थांब” ती आतल्या खोलीत गेली. बाहेर आली तेव्हा तिच्या हातात विनयचा बेल्ट होता.

“हा तोच बेल्ट आहे ना विनय ?” तिने बेल्ट हवेत फिरवत विचारलं

“हो..”

“अजून सांभाळून ठेवलास ना ? छान केलंस”

“तुला माहित होतं हा माझ्याकडे अजून आहे ते”

“हो. तू इथे रहायला आलास तेव्हापासूनच. खरं तर त्यामुळेच माझी पुर्ण खात्री होती तुझ्या समर्पणाबद्दल.”

“एक विचारु सविता? मी दोन महिन्यापुर्वी जेव्हा तुझ्याकडून शिक्षा घ्यायला नकार दिला खरंतर तेव्हाच तू बेल्टने फोडून काढून माझं बंड मोडून काढू शकली असतीस. मग तु तसं का नाहि केलंस ?”

“विनय, एक तर मी त्याला बंड म्हणणार नाही. बंड गुलाम करतात आणि तु गुलाम नाहीस. तु फक्त आपल्या प्रेमाचाच एक भाग ,आपल्या प्रेमाचं एक वैशिष्ट्य नाकारलंस. अणि दुसरं म्हणजे मला ते चाबकाच्या जोरावर तुझ्यावर लादायचं नव्हतं. आपण हळूहळू प्रेमाने जवळ येत गेलो. मी तुझ्यावर वर्चस्व गाजवू लागले आणि तू स्वत:ला समर्पित करत गेलास. यात कुठेही जोर जबरदस्ती नव्हती. आता तू हे नाकारुन चूक केलीस. तू अशी चूक का केलीस ते मला माहित नाही. पण तुझी चूक तुला जाणवेपर्यंत तुला वेळ देण आणि वाट पहाणं गरजेचं होतं”

“सविता, तू खूप हुशार, विचारी आणि समंजस आहेस. तुझ्या पायांशी स्वत:ला समर्पित करण्यातच माझ्या सुखाचा मार्ग आहे”

“बरं बरं. आता बोलण्यात वेळ घालवायचा नाहीये..” तिने बेल्ट डाव्या हातात घेत उजव्या हाताने त्याच्या गालावर सणकन थप्पड मारली.

“येस मॅम..” तो मान खाली घालून म्हणाला.

तिने पुन्हा अजून एक जोराची थप्पड दिली

“मॅम आज खूप काळानंतर तुमच्याकडून थप्पड मिळाली..” त्याच्या डोळ्यात पाणी आले.

तिने त्याला अजून दोन-तीन कानाखाली वाजवल्या.

“शर्ट काढ आता” तिने फर्मावले.

त्याने शर्ट काढला.

“बेल्टने मारताना मी फटके मोजत नाही हे तुला माहित आहेच.”

“यस मॅम, तुमच्याकडून असंख्य, अगणित फटके खायला मी आतुर आहे.”

तिने उजव्या हातात बेल्ट घेतला. बेल्ट हवेत फिरवून त्याच्या पाठीवर फटका दिला. त्याचे अंग शहारले. तो उत्तेजित झाला होता. पुन्हा पुन्हा बेल्ट हवेत फिरुन त्याच्या पाठीवर पडू लागला आणि वळ बनू लागले.  आणि त्या बरोबरच त्याच्या मनात साचून राहिलेली निराशा, अस्वस्थता लोप पावत होती.

(समाप्त)

प्रिय वाचक,
कृपया खालीलपैकी योग्य ती प्रश्नावली म्हणजेच सर्वे (survey)उघडून प्रश्नांची उत्तरे द्या.
घन्यवाद.

स्त्री-वाचकांकरिता-प्रश्नावली

पुरुष-वाचकांकरिता-प्रश्नावली

[संपर्क – samarpan.ek.premkatha@gmail.com]

माझं अन्य लेखन खालीलप्रमाणे आहे. रसिक वाचकांनी खालील लिंक्स क्लिक करुन आनंद घ्यावा

मेरे रंग मे रंगनेवाली (लघुकथा)

सायबर कॅफेत एक दिवस (लघुकथा)

रसिकाचे स्वयंवर (नाटक / एकांकिका)
Advertisements

34 thoughts on “समर्पण – एक प्रेमकथा

 1. तुमची कथा फार आवडली. तुमच्याशी संपर्क साधण्यासाठी आम्ही आपला इमेल पत्ता शोधत होतो पण इथे सापडला नहि. कृपया मला इमेल पाठवा.

 2. Khup chaan aahe prem katha …… ekdam veglich kadi aikali ni ashii ….. pratek natyacha ek veglach godwa asto ….. jasa vinay n savita cha natyat hota ….. kharachh apratim aaheee …. 🙂

 3. Premacha mar ha Preyshi , Mitramaitrini,Bayko kadun hi asel tar tyat kay vaeth nasoch te + godach lagnar naaaa…..

  kup chan mast…
  Mala tar shabadch nahi saganyla ….

 4. Khup sundar lihla aahe…..aata paryant BDSM chya kiti tari stories me wachlya hotya…..pan pahlyandach kuthlya marathi mansane tyawar lihla asa mala watat……..khup sundar aahe …..ha maza email id ……jar watla tar contact karal……kaanmarod@gmail.com

 5. khup aawadali aapli katha ani thodi swatahachya ayushyat miltijulati pan watali….wachun janwal as kathetach nahi tar kharya ayushyat pan as ghadu shakate… aapan as lihat raha amhi manapasun wachan karat jau….thanks

 6. khup khup chan ahe he samrpan ek velgle nate ahe doghat ek veglech prem ahe je shabdhat vyakta karta nahi yet ahe thanx tumchya mule evhadi chan love story vachayla milali hya badhal

 7. Khup chaan aahe prem katha …… ekdam veglich kadi aikali ni ashii ….. pratek natyacha ek veglach godwa asto ….. jasa vinay n savita cha natyat hota ….. kharachh apratim aaheee ….

 8. प्रेमातला हा गुलामीचा प्रकार नव्हता. “गुलाम बंड करतात” या एका वाक्यातून कथानक अतिशय आवडलं.

 9. Khup Sundar katha ahe, Premala vayachi aat naste, tasech yogya vel yeus pariyant aapan bhanana kiti sahaj ritya japala ahe. sundar asha padhtite sangitale ahe. nata he kathor samanjyas primal & shistit asayla hava he dakhvle ahe. great story

 10. खरंच, ही एक “अत्यंत सुंदर” आणि “अद्भुत” प्रेम कथा आहे. खरतर
  हे दोनीही शब्द कमी पडतील, इतकी वेगळो, छान ही प्रेमकथा होती.
  पण, माझ्या मते कथेच्या शेवटी विनयला सुधारलेला दाखवला पाहिजे होते.
  कदाचीत माझ चूकतही असेल, कारण ही कथा तुमच्या खालील दिलेल्या CATAGORY मधली देखील असू शकते.
  पण आपले लिखाण 1नं. आहे. त्याला तोडच नाही आणि यात वादच नाही.
  God bless you

 11. Tumachi katha tumcha shirshakala sajeshi ahe. Farach chchan, Uttam😊
  Tumhi “Marathi serial’s” madhe ka nahi try karat?
  Tumcha sarkhya “likhanatale” lekhak khupacha kami ahet.
  Kiti sahaj pane tumhi Samarpanatmak bhavna tumcha jashi dockyat aali tashi cha tashi “Shabdat” utaravlit, wah!
  Tumcha mule aanek janan na SAMARPAN mhanje nakki kay te samjanar ahe.
  Thank you for such A Hart Touching Story

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s